घरताज्या घडामोडीबहुचर्चित 'दृश्यम २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस, मुख्य भूमिकेत असणार 'हे' कलाकार

बहुचर्चित ‘दृश्यम २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस, मुख्य भूमिकेत असणार ‘हे’ कलाकार

Subscribe

'दृश्यम'चा दुसरा पार्ट म्हणजेच 'दृश्यम २' चित्रपटावर काम लवकरच सुरू होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा आटोक्यात येताच चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा Active झाली आहे. जे चित्रपट थिएटर बंद असल्यामुळे प्रदर्शित होऊ शकले नाहीत, त्याची प्रदर्शनाची तारिख सतत जाहीर केली जात आहे. तसेच ज्या चित्रपटांच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि होणार आहे, त्यासंबंधीत अपडेट सातत्याने समोर येत आहेत. अशातच बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘दृश्यम’बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, लवकरच ‘दृश्यम’चा दुसरा पार्ट म्हणजेच ‘दृश्यम २’ चित्रपटावर काम सुरू होत आहे. खास म्हणजे ‘दृश्यम २’मध्ये अजय देवगण आणि तब्बूला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियासोबत बातचीत करताना एका सुत्राने सांगितले की, ‘अजय देवगण आणि तब्बू या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाले आहेत. पण अजूनही इतर कास्ट निवडण्याचे काम अजून बाकी आहे. तसेच निर्मात्याद्वारे चित्रपटाचे राईट्स घेण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.’

- Advertisement -

माहितीनुसार, ‘दृश्यम २’ चित्रपट हा १९ फेब्रुवारी २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘दृश्यम २’ चा हिंदी रिमेक असेल. मल्याळम चित्रपट ‘दृश्यम २’मध्ये साऊथ सुपरस्टार मोहन लालने मुख्य भूमिका निभावली आहे. या भूमिकेसाठी मोहन लाल याचे खूप कौतुक केले गेले. तर आता हिंदी रिमेकमध्ये पुन्हा अजय देवगण ‘दृश्यम २’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘दृश्यम २’ या हिंदी रिमेकचे निर्मिती कुमार मंगत करणार आहे.


हेही वाचा – सनी लिओनच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर, मुंबईतून तरुणाला अटक

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -