अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

Akshay kumar returned to india from uk urgently after his mother aruna bhatia was admitted icu
अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया आयसीयूमध्ये दाखल

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर समोर आली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘बच्चन पांडे’ सारख्या चित्रपटानंतर आता अक्षय कुमार ‘धूम ४’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत खुलासा केला आहे. ही खुशखबर देताना अतुल मोहन म्हणाला की, ‘धूम ४’ या चित्रपटासाठी दुसरं तिसरं कोणी नसून अक्षय कुमारला साइन केलं आहे. याबाबत अजूनपर्यंत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही आहे. मात्र अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर उत्सुकता वाढली आहे.

अक्षय कुमारच्या ‘धूम ४’ या चित्रपटाबद्दल बोलताना अतुल मोहन यांनी लिहिलं, ‘अक्षय कुमार ‘धुम ४’ मध्ये असल्याचा खुलासा एक स्त्रोताने केला आहे. त्यामुळे आता आपण त्याबद्दल अधिकृत माहितीची प्रतीक्षा करूया.’ अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये ‘धूम ४’ची माहिती ऐकताच उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी अक्षय कुमारचा ‘अतरंगी रे’ या चित्रपटाबाबत जाहीर झाले होते. ज्यामध्ये अक्षय सोबत सारा अली खान आणि धनुष असणार आहे. आनंद एल राय हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

लवकरच अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. २७ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कतरिना कॅफ ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टीने या चिपटाच्या दिग्दर्शनांची धूरा सांभाळली आहे. याशिवाय अक्षय कुमार ‘लक्ष्मी बॉम्ब’ मध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्ता यावर्षी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – Video: रितेशने दुसऱ्यावर प्रेम असल्याचा जेनेलियासमोर केला खुलासा