अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’च्या सेटवरून शेअर केला व्हिडिओ अन् झाला भावूक

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट रक्षाबंधनच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने नुकताच दिल्लीच्या चांदणी चौक येथील सेटवरून त्याच्या सोशल मीडियावर चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पळत असल्याचे दिसून येत आहे. यासोबत या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार एक सीन शुट करताना दिसतोय. इतकेच नाही तर तो थोडा भावूक देखील होतो. कारण ज्या ठिकाणी या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे त्याच ठिकाणी त्याचे बालपण गेले आहे.

हा व्हिडिओ अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने असे लिहिले की, ‘रक्षाबंधनच्या सेटवरील आज सकाळच्या पळण्याने बऱ्याच बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कारण हे चांदणी चौक ठिकाण माझं जन्मस्थान आहे. आजू-बाजूला राहणाऱ्या लोकांचा संवाद ऐकून किती छान वाटतं, जो संवाद तुम्हाला कधीच वयोवृद्ध होऊ देत नाही.’ अक्षयच्या या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत असून त्यावर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

बघा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले असून अभिनेता अक्षय कुमारसह अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील अभिनय करताना दिसणार आहे. भूमी या चित्रपटात अक्षय कुमारच्या बहिनीची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी या दोघांनी टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाची घोषणा अक्षय कुमारने २०२० या वर्षात केली असून हा चित्रपट त्याने त्याची बहिन अलका भाटियाला समर्पित केली आहे. हा चित्रपट पुढच्य़ा वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.


राज्यपाल कोश्यारी यांनी केले सामाजिक विषयावर आधारलेल्या ‘सोसायटी’चे पोस्टर लाँच