video : अक्षय कुमारने स्विकारलं ‘बॉटल कॅप चॅलेंज’

हा व्हीडीओ सोशलमिडीयावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडीओत अक्षयने बॉटल कॅप चॅलेंज स्विकारलं आहे.

Akshay-Kumar
अभिनेता अक्षय कुमार

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारला फिटनेस किंग का म्हणतात हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. नेहमी चित्रपटातून अॅक्शन सीन करून तो प्रेक्षकांची मनं जिंकतोच पण आता अक्षय हा व्हीडीओबघून तुम्ही त्याचे ‘डाय हार्ट फॅन’ बनाल हे नक्की. हा व्हीडीओ सोशलमिडीयावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडीओत अक्षयने बॉटल कॅप चॅलेंज स्विकारलं आहे.

सध्य़ा सोशलमिडीयावर बॉटल कॅप चॅलेंज ट्रेंड होत आहे. अक्षयने हे चॅलेंज स्विकारलं आहे.

अक्षयने एक किक मारून बॉटलचं झाकण उडवलं आहे. अक्षयने मारलेल्या या परफेक्ट किकमुळे बॉटलजरा सुध्दा जागेवरून न हालता केवळ झाकण उडालं आहे. अक्षयचा हा व्हीडीओ त्याच्या फॅन्सला प्रचंड आवडला आहे. काही मिनीटातच या व्हीडीओला लाखो लाईक्स मिळाले. या व्हीडीओमधला अक्षयच रूप बघण्यासारखं आहे.

लवकरच अक्षयचा सुर्यवंशी चित्रपट प्रेक्षकांच्या बेटीला येईल. या चित्रपटात कॅटरीना कैफ मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित करत आहे.