Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Viral Video: म्हणून अलाया फर्निचरवालाने भर स्टेजवर आजोबा कबीर बेदींना मारली मिठी

Viral Video: म्हणून अलाया फर्निचरवालाने भर स्टेजवर आजोबा कबीर बेदींना मारली मिठी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री पुजा बेदी (Puja Bedi)ची मुलगी आणि कबीर बेदीची नात अलाया फर्निचरवालाने (Alaya furniturewala) जवानी जानेमन (Jawani Janeman) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान आणि तब्बू दिसली होती. याच चित्रपटासाठी यंदाच्या ६६व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये (66th Filmfare Award)बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड अलाया फनिर्चरवाला (Alaya F remebers special moments of filmfare Awards) हिला मिळाला.

हा अवॉर्ड मिळाल्यानंतर अलायाने आनंदाच्या भरात एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अलायाच्या आयुष्यातील खास क्षण दिसत आहे. पाहायला गेलेतर अलाया ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. आता अलायाने फिल्मफेअर बेस्ट फीमेल डेब्यू अवॉर्ड मिळाल्यानंतरचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘हा माझ्या आयुष्यातला असा दिवस आहे, ज्याचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. परंतु खास म्हणजे माझे प्रिय आजोबा कबीर बेदी यांनी मला फिल्मफेअर अवॉर्ड दिला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

- Advertisement -

एका वृत्त संकेतस्थळाशी बातचित करताना अलाया म्हणाली की, ‘माझ्या आयुष्यातला पहिला अवॉर्ड मी आजोबा नाना कबीर बेदी यांच्याकडून घेतला. याहून खास असे काही नाही. हे माझ्यासाठी एक स्वप्नाप्रमाणे होते, मी अशी कधीच कल्पना केली नव्हती. आजोबांच्या चेहऱ्यावर सर्व काही दिसत होते. त्यावेळेस माझ्या मनात खूप काही सुरू होते. मी जेव्हा स्टेजवर आभार व्यक्त करत होते तेव्हा आजोबा मला एकदम शांतपणे बघत होते.’


हेही वाचा – अभिनेता आरोह वेलणकरचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक,अज्ञात हॅकर्सने दिली धमकी


- Advertisement -

 

- Advertisement -