घरताज्या घडामोडीAmir Khan Announces Divorce: आमिर किरणमध्ये दुरावा! १५ वर्षांनी घेणार घटस्फोट

Amir Khan Announces Divorce: आमिर किरणमध्ये दुरावा! १५ वर्षांनी घेणार घटस्फोट

Subscribe

'लगान' सिनेमाच्या सेटवर झाली होती आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan ) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी विभक्त होण्याच निर्णय घेतला आहे. १५ वर्षांचा संसार मोडून आमिर खाने पत्नी किरण रावसोबत घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी एका जॉइन स्टेटमेंटमध्ये याविषयी खुलासा केला आहे. आमिर आणि किरण यांची जोडी बॉलिवूडची लाडकी जोडी होती. किरण आमिरचा घटस्फोट हा त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. (Bollywood Actor Amir Khan And Kiran Rao Announces Divorce after 15 years of marriage)

- Advertisement -

घटस्फोटाच्या निर्णयावर आमिर खानची प्रतिक्रिया

 

- Advertisement -

आम्ही संसाराची पाच वर्षे खूप आनंदात सोबत घालवली हा आमच्यासाठी आयुष्यभराचा अनुभव आहे. आमची सुख,दु:ख,आनंद एकमेकांसोबत शेअर केली. आमचे नाते विश्वास,सन्मान आणि प्रेमावर आधारित होते. आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. आम्ही नवरा बायको म्हणून नाही तर चांगले आई वडिल म्हणून राहणार आहोत. आम्ही एकमेकांपासून वेगळे होत असलो तरी पाणी फाऊंडेशन किंवा सिनेमांचे काम एकत्रित करणार आहोत. आम्ही परस्पर संमतीने हा घटस्फोट घेत असल्याची प्रतिक्रिया आमिर खाने दिली आहे.

 

कुटुंबियांचे मानले आभार

आमच्या नात्याला निरंतर पाठिंबा देण्यासाठी आणि आम्हाला समजून घेण्यासाठी कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे खूप खूप आभार असे आमिर आणि किरणने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. इथून पुढे तुमचे प्रेम आणि आशिर्वाद आमच्यासोबत असेच राहिल अशी आशा आहे. आमचा घटस्फोट म्हणजे कोणताही शेवट नसून आमच्या नवीन प्रवासाची सुरुवात असल्याचे आमिर आणि किरण राव यांनी म्हटले आहे.

लगान सिनेमाच्या सेटवर झाली पहिली भेट

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट ही ‘लगान’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. तिथेच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली आणि त्यानंतर २८ डिसेंबर २००५ मध्ये दोघांनी लग्न केले. सरोगसीच्या मदतीने दोघांना एक मुलगा झाला. १५ वर्षांत अनेक उतार चढावांचा दोघांनी एकत्रित सामना केला. किरण राव हिच्यासोबत आमिरचा हा दुसरा विवाह होता. मात्र दोघांच्या नात्यातून कधीच असे दिसून आले नव्हते. बॉलिवूडमधील रोमँटिक कपल म्हणून दोघांकडे पाहिले जायचे.


हेही वाचा – कला दिग्दर्शक राजू सापते यांची पुण्यात आत्महत्या, युनियन कडून मानसिक जाच

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -