घरCORONA UPDATEFake News : अमिताभ बच्चन यांना मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Fake News : अमिताभ बच्चन यांना मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Subscribe

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या ते नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या दरम्यान, आज माध्यमांमधून त्यांच्या कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याची तसेच त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यावर अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करून या बातम्या चुकीच्या आणि फेक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या व्हिडिओला टॅग केले असून हे अत्यंत बेजबाबदार आणि धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन तसेच सून ऐश्वर्या राय बच्चन व नात आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

- Advertisement -

११ जुलै रोजी रात्री अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्या माहिती प्रसार माध्यमातून येऊ लागली. तसेच या कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा दिला. संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झालेली असताना जया बच्चन यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली.

हेही वाचा –

महिलेच्या मृत्यूनंतर ५ दिवसांनी रिपोर्ट आला Positive! अंत्यविधीला होते ३०० हून अधिक लोकं हजर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -