घरताज्या घडामोडीनातीने सांगितलेला कोरोनाचा अर्थ ऐकून बिग बी झाले हैराण!

नातीने सांगितलेला कोरोनाचा अर्थ ऐकून बिग बी झाले हैराण!

Subscribe

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप Active असतात. चाहत्यांसाठी नेहमी पोस्ट शेअर करत असतात. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देखील देत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान अमिताभ बच्चन नात आराध्याने सांगितलेला कोरोनाचा अर्थ ऐकून हैराण झाल्याचे समोर आले आहे. हा कोरोनाचा अर्थ यापूर्वी कधी कोणी सांगितला नव्हता असे अमिताभ बच्चन म्हणाले आहेत. एनडीटीव्हीच्या एका खास कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा अनुभव सांगितला आहे.

या कार्यक्रमात कोरोना, मास्क, हाताची स्वच्छता आणि साफ-सफाईसारख्या मुद्द्यांवर खास चर्चा सुरू होती. कोरोनाच्या काळात या सर्व गोष्टी करणे फार महत्त्वाचे आहे. याबाबत बोलत असताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘कौन बनेगा करोडपतीची शूटिंग करत होता. माझी नात आराध्या बच्चन केबीसी पाहून झाल्यावर मला फोन करते. शूटिंग करत असताना तिचा फोन आला आणि ती म्हणाली की, कोरोनाचा अर्थ क-रो-ना म्हणजे Don’t do. जेव्हा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा मी हैराण झालो. यापूर्वी कोणीही हे सांगितले नाही.’

- Advertisement -

सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’चा १२ वा सीझन होस्ट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आयुष्मान खुरान मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अमिताभ बच्चन लवकरच ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


हेही वाचा – ‘कागर’नंतर शुभंकर तावडे दिसणार ‘या’ चित्रपटात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -