बिग-बींनी शेअर केले मॉडलिंगचे थ्रो बॅक फोटो; चाहते म्हणाले…

बिग-बींनी शेअर केले मॉडलिंगचे थ्रो बॅक फोटो; चाहते म्हणाले...

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अमिताभ बच्चन सतत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसह शेअर करून कनेक्ट असतात. मात्र आता अमिताभ बच्चान त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करत असल्याचे सोशल मीडियावर दिसतंय. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मॉडेलिंगचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे चाहत्यांना चांगलेच भुरळ घालत आहेत. या फोटोमध्ये अमिताभ अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. या थ्रोबॅक फोटोमध्ये त्याची उभे राहण्याची शैली जबरदस्त लक्षवेधी ठरतेय.

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. नुसते फोटोच त्यांनी शेअर केले नाही तर त्यांनी त्याला एक कॅप्शन देऊन जुन्या आठवणी मिस करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘त्या दिवसात परत जाणे खूप छान होईल .. पण’. यासह, त्याचा हा अनोखा थ्रो बॅक फोटो पाहिल्यानंतर चाहते त्याची जोरदार स्तुती करत आहेत. एका चाहत्याने यावर असे लिहिले आहे की ‘मी तुमच्या मेहनतीबद्दल प्रशंसा करतो आणि तूम्ही खूप सुंदर व्यक्ती आहात’, तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की ‘उगाच लोकं तुमचे चाहते नाहीत’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम होस्ट करत आहे त्यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता यशाचा शिखरावर पोहोचली आहे. याशिवाय, नुकताच त्यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्ती दिसले आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘बटरफ्लाय़’, ‘मेडे’, ‘गुडबाय’ आणि नाग अश्विनचा एक चित्रपट देखील केला असल्याचे सांगितले जात आहे.


अल्लू अर्जुन-रश्मिका स्टारर फिल्म ‘Pushpa The Rise’ च्या रिलीजची तारीख जाहीर