बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्य़ा नवाब कुटूंबात काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्या पाहुण्याचा जन्म झाला. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान आता त्या छोट्या पाहुण्याला त्यांच्या घरी घेऊन आले आहेत. संपूर्ण बॉलिवूड या जोडप्यास खूप शुभेच्छा देत असून तैमूरचा धाकटा भाऊ पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी हजेरी लावली. करीना आणि सैफ याने अजूनही बाळाची झलक चाहत्यांना दाखवली नाही. करीनाचा भाऊ अर्जून कपूर आणि मैत्रीण मलायका अरोरा रविवारी संध्याकाळी बाळाला पाहण्यासाठी करिनाच्या घरी पोहोचले मात्र यावेळी त्याठिकाणी फोटोग्राफर्सचे वागणे अर्जूनला रुचले नाही. तो फोटोग्राफर्सवर भडकलेला दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अर्जून कपूर त्याच्या कारमधून उतरल्यावर काही फोटोग्राफर्स त्याठिकाणी बिल्डिंगच्या भिंतीवर चढून फोटो काढण्याचा प्रयत्न करत असलेले त्याच्या नजरेस पडले. या फोटोग्राफर्सना सुरुवातीला अर्जूनने असे न करण्याची विनंती केली. अर्जून समजवून सांगत असतानाही एक फोटोग्राफर भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होता हे पाहिल्यावर मात्र अर्जूनला राग अनावर झाला.
View this post on Instagram
त्यानंतर तो गेटजवळ पोहोचला आणि म्हणाला, ‘मी विनंती करत आहे पण तुम्ही ऐकायला तयार नाही. अरे भावा… लाल शर्टवाला आता घाबरून का पळत आहेस.’अर्जूनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा – मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये अंकुश चौधरीची गुंतवणूक