बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या वडिलांचे निधन

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे वडील प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी चंदीगड येथे निधन झाले आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता त्यांच्यावर चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पी खुराना यांना पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याबाबत आयुष्मान आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराना यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय की, “आम्हाला कळविण्यास खेद वाटतो की, आयुष्मान खुरानाचे वडील ज्योतिषी पी खुराना यांचे मोहाली येथे सकाळी 10.30 वाजता निधन झाले. या काळात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार”.

कोण होते पी खुराना?

आयुष्मान खुरानाचे वडील ज्योतिषाचार्य पी खुराना यांचे दीर्घ आजाराने मोहाली येथे निधन झाले.

आयुष्मान खुरानाचे वडील पंडित पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. पी खुराना यांना अपारशक्ती खुराना आणि आयुष्मान खुराना ही दोन मुलं होती. ज्योतिषाच्या क्षेत्रातील योगदानामुळे पी खुराना हे उत्तर भारतातही खूप लोकप्रिय होते. ते पंजाबमधील चंदिगड येथे राहायचे. त्यांनी ज्योतिष शास्त्रावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. आयुष्मान खुराना 2020 मध्ये त्याच्या वडिलांबद्दल बोलला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, “माझा ज्योतिषाचार्यांवर विश्वास नाही, पण माझे वडील आयुष्यभर त्याचे प्रशिक्षण घेत आहेत. ते मला नेहमी सांगायचे की बेटा जनतेची नाडी घे. मी तेच केले.”

 


हेही वाचा :

कान्समधील लूकवरून ऐश्वर्या ट्रोल, जादू बरोबर तुलना