Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ भूमी पेडणेकर आणि विकी कौशल कोरोना पॉझिटिव्ह

अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ भूमी पेडणेकर आणि विकी कौशल कोरोना पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट होतोना दिसत आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. आता अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकराला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. तसेच बॉलिवूडच्या चॉकलेट बॉय विकी कौशलचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भूमीने नक्की पोस्टमध्ये काय लिहिले आहे?

#1. आज माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली. पण मी ठिक आहे आणि स्वतःला क्वारंटाईन केले आहे. डॉक्टर आणि हेल्थ प्रोफेशनल्ससोबत संपर्कात आहे आणि सर्व सावधगिरी बाळगत आहे.

- Advertisement -

#2. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असला तर तुम्ही त्वरित कोरोना चाचणी करा.

#3. व्हिटॅमिन-सी आणि खाण्यापिण्याची काळजी घेत आहे.

- Advertisement -

#4. या परिस्थितीला कोणत्याही व्यक्तीने हलक्यामध्ये घेऊ नका. मी सर्व प्रकारची सावधानगिरी बाळगत होती. परंतु कोरोना विषाणूने मला गाठलं. मास्क घाला, हात सतत धुत राहा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि योग्य गोष्टी करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

‘सर्व काळजी घेऊनही दुर्दैवाने माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्व प्रोटोकॉलचे पालन करत मी होम क्वारंटाईन झालो आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार उपचार घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी त्वरित कोरोना चाचणी करावी. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,’ अशी विकी कौशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 भूमी पेडणेकर आणि विकी कौशलपूर्वी अभिनेता अक्षय कुमाराला कोरोनाची लागण झाली होती. तो आता उपचाराकरता दाखल झाला आहे. त्यानंतर अभिनेता गोविंदा, गायक आदित्य नारायण, अटकेत असलेला एजाज खान यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.


हेही वाचा – अक्षय कुमार रुग्णालयात, झाली आहे कोरोनाची लागण


 

- Advertisement -