घरमनोरंजनव्यायाम करताना झाला होता त्रास; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं कारण

व्यायाम करताना झाला होता त्रास; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं कारण

Subscribe

धर्मेंद्र यांना व्यायाम करत असताना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता रूग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी आपल्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पाठदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी संध्याकाळी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सूत्रांच्या मते धर्मेंद्र यांना व्यायाम करत असताना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता रूग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी आपल्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या प्रकृतीबाबत बोलताना दिसत आहेत. ज्यामध्ये ते चाहत्यांना सांगत आहेत की, “मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मी जे केलं त्याचा परिणाम मला सहन करावा लागत आहे. व्यायाम करताना पाठीवरची मांसपेशी खेचली गेल्याने मला अचानक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मागील ४ दिवसांपासून मला खूप त्रास झाला. परंतु आता तुमच्या प्रार्थना आणि आशिर्वादामुळे मी ठीक आहे आणि घरी सुखरूप परतलो आहे. यामुळे आता मी इथून पुढे असं काहीही करणार नाही.” धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

धर्मेंद्र यांना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता म्हणून ओळखले जाते. १९६० साली त्यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘यादों की बारात’ , ‘सत्यकम’ आणि ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय आता ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या आगामी चित्रपटात दिसून येतील. या चित्रपटात जया बच्चन, शबाना आजमी , आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisement -

 

वीर दौडले सात…महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्र दिनी नव्या चित्रपटाची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -