घरमनोरंजनबॉलिवूड अभिनेत्याने पहिल्यांदाच केलं न्यूड फोटोशूट; रणवीरच्या फोटोशूटवर विद्या बालनची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्याने पहिल्यांदाच केलं न्यूड फोटोशूट; रणवीरच्या फोटोशूटवर विद्या बालनची प्रतिक्रिया

Subscribe

विद्या बालन गुरूवारी फटका मराठी या सिने अवार्ड्समध्ये गेली होती. यावेळी तिला रणवीरच्या फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने एक गमतीशीर उत्तर दिलं

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, शिवाय काही जणांनी तर त्याच्या अतरंगी फोटोंवर मिम्स सुद्धा तयार केले. दरम्यान आता, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट यांरख्या अनेक कलाकारांनी रणवीरची पाठराखण केली.
दरम्यान, आता अभिनेत्री विद्या बालनला एका इंटरव्यूवेळी रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा विद्याने खूप गमतीशीर उत्तर दिलं.

विद्या बालन गुरूवारी फटका मराठी या सिने अवार्ड्समध्ये गेली होती. यावेळी तिला रणवीरच्या फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने एक गमतीशीर उत्तर दिलं. त्यावेळी विद्या म्हणाली की, “अरे काय समस्या आहे? महिलांना सुद्धा नेत्र सुख घेऊ द्या. बॉलिवूड अभिनेत्याने पहिल्यांदाच न्यूड फोटोशूट केलं आहे.” त्यानंतर विद्याला रणवीर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, “जर कोणाला या फोटोमुळे त्रास होत असेल तर त्यांनी ते नका पाहू. बहुतेक त्यांच्याकडे जास्त काम नसेल, त्यामुळेच ते या सर्व गोष्टींमध्ये स्वताःचा वेळ वाया घालवत आहेत. जर तुम्हाला नाही आवडत तर, तुम्ही पाहूच नका, पण तक्रार करायची काय गरज आहे?”

- Advertisement -

या कलाकारांचा रणवीर सिंहला पाठिंबा
२१ जुलै रोजी रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. आत्तापर्यंत या फोटोंवर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी रणवीर सिंहला पाठिंबा दिला आहे. आत्तापर्यंत अर्जुन कपूर, आलिया भट्ट, राम गोपाल वर्मा, विवेक अग्निहोत्री यांसह अनेक हिंदी टेलिव्हिजन कलाकारांनी रणवीर सिंहला सपोर्ट केला आहे.


हेही वाचा :‘महारानी २’ च्‍या प्रतिभावान कलाकारांमध्‍ये अनुजा साठे चा समावेश

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -