Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन फरहान अख्तरची हॉलिवूडमध्ये एंट्री!

फरहान अख्तरची हॉलिवूडमध्ये एंट्री!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आता हॉलिवूडमध्ये पदापर्णास सज्ज झाला आहे. लवकरंच फरहान मार्वल स्टुडिओजच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. या प्रोजेक्ट अद्याप अभिनेता फरहानने कोणताही खुलासा केला नाही. दरम्यान तो आता मुंबईत आगामी बॉलिवूडमधील शुटिंगसाठी रवाना झाला आहे. मार्वल स्टुडिओजच्या आगामी प्रोजेक्टमधील शुटिंगसाठी फरहान गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कलाकार आणि क्रू मेंबरसह बँकॉकमध्ये होता. मात्र फरहानने अद्याप या प्रोजेक्टबाबत कोणताही माहिती चाहत्यांना दिली नाही. जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओमधील एक म्हणून मार्वल स्टुडिओजचे नाव घेतले जाते. त्यामुळे फरहानची ही हॉलीवूड एंट्री देखील मार्वल आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

- Advertisement -

अमेरिका स्थित मार्वल स्टुडिओ एक भव्यदिव्य टेलिव्हिजन शुटिंग स्टुडिओ आहे. या स्टुडिओला सिनेमॅटिक युनिवर्स चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. या स्टुडिओने निर्मित केल्या अनेक चित्रपटांना, कार्टन्स शोला जगभरातून पसंती मिळते. फरहान अख्तर बॉलिवूड सिनेमातील एक प्रभावशाली अभिनेता आहे. याचबरोबर तो एक निर्माता, गायक, लेखक, दिग्दर्शक यांसारख्या अनेक भूमिकांमधून देखील तो प्रेक्षकांसमोर आला. नुकतेच त्याचा आगामी तूफान या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. या टिझराला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान २१ मे ला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याचबरोबर आगामी हॉलिवूड प्रोजेक्टमधील फरहानची भूमिका पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत.


हेही वाचा- सुप्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशला कोरोनाची लागण


 

- Advertisement -