Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सिंघम गर्ल वयाच्या पाचव्या वर्षापासून 'या' आजाराने ग्रस्त!

सिंघम गर्ल वयाच्या पाचव्या वर्षापासून ‘या’ आजाराने ग्रस्त!

सोशल मीडियाच्या माध्यमातून काजल अग्रवालने स्वतःच्या आजाराबाबत केला खुलासा

Related Story

- Advertisement -

साउथ इंडियन आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काजल सिंघम गर्ल म्हणून ओळखली जाती. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबरला काजलचा थाटामाटात मुंबईत विवाह सोहळा पार पडला. बिझनेसमॅन गौतम किचलूसोबत काजलने आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. काजलने तिच्या लग्नाबाबतची सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. काजल आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. आता तिने आपण एका आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा केला आहे.

सिंघम गर्ल काजलने एक फोटो शेअर करत आपल्याला अस्थमा असल्याचे सांगितले आहे. तिच्या आयुष्यात इनहेलर एक भाग असून तिने इनहेलरचे महत्त्व चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काजल म्हणाली की, ‘इनहेलरचा वापर करताना तुम्ही घाबरू नका आणि लाजूही नका. ही आपली गरज आहे.’ काजलची अशाप्रकरची पोस्ट वाचून चाहते अक्षरशः भावूक झाले आहेत.

- Advertisement -

पुढे काजलने सांगितले आहे की, ‘वयाच्या पाचव्या वर्षी समजले की तिला ब्रोन्कियल अस्थमा आहे. तेव्हापासून तिला सर्व आवडणारे पदार्थ खाण्यास मनाई केली गेली होती. ते दिवस तिच्यासाठी खूप कठीण होते, परंतु हळूहूळू तिच्यासाठी सर्व काही सोपे झाले.’ पुढे इनहेलरचे महत्त्व सांगताना काजलने आपल्या चाहत्यांना सांगितले की, ‘याचा वापर करून मला एक बदल जाणवला. मला खूप आराम मिळाला. इनहेलरबाबत सर्वांना जागरूक करण्याचा आवाहन करते.’ सध्या काजलची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.


हेही वाचा –  सिंघम गर्ल ‘या’ उद्योगपतीसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार


- Advertisement -

 

- Advertisement -