येस बँकवर आलेल्या संकटाला अर्जुन कपूर जबाबदार

बॉलिवूड अभिनेता कमाल खान त्याच्या ट्विटमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आता देखील त्याने अर्जुन कपूर बाबत ट्विट करून चर्चेत आला आहे.

bollywood actor kamaal r khan slams arjun kapoor for yes bank crisis tweet viral
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर

सध्या खासगी क्षेत्रातील येस बँकेची परिस्थिती बिघडली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या अनियमिततेच्या विषयावरून या बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेतून महिनाभरात फक्त ५० हजार रुपये काढण्याची मुभा खातेदारांना दिली गेली आहे. येस बँकवर आलेल्या संकटावर बॉलिवूड कलाकारांनी ट्विट केले आहेत. नुकतचं याबाबत बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान देखील ट्विट केलं आहेत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरमुळे येस बँकेची अशी परिस्थिती झाली असल्याचं कमाल खान याने म्हटलं आहे. कमाल खान असं म्हणाला आहे की, २ स्टेटमध्ये अर्जुन कपूर येस बँकमध्ये काम करताना दाखवले होते, पण आता येस बँक बुडली आहे. अर्जुन कपूरच्या बाबत केलेलं हे कमाल खानचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येस बँकवर आलेल्या संकटाला जबाबदार अर्जुन कपूर असल्याचं सांगत कमाल खानने असं ट्विट केलं की, आजवर अर्जुन कपूरने ज्या चित्रपटात काम केलं आहे. ते सर्व चित्रपट फ्लॉप झाले आहेत. पण एक चित्रपट सुपरहिट झाला होता. तो म्हणजे २ स्टेट. या चित्रपटात अर्जुन कपूर येस बँकेत काम करताना दाखवला होता. आणि आता येस बँकेही बुडाली आहे.

या अगोदर कमाल खानने करोना व्हायरस संदर्भात ट्विट केलं होते. ‘भारतातही करोनाची लागण व्हावी’, असं धक्कादायक वक्तव्य कमाल खानने केलं होते. ऐवढ्यावरच न थांबता कमाल खान याने करोनाची लागण भारतीयांना देखील व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे, असं देखील त्याने ट्विट करताना म्हटलं होत.


हेही वाचा – ‘बधाई हो’च्या सिक्वलमध्ये आयुष्मान नव्हे ‘ही’ भन्नाट जोडी करणार स्क्रीन शेअर