Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'हार्टलेस पिपल्स’! राजीव कपूर यांच्या निधनानंतर कपूर फॅमिलीचे सेलिब्रेशन

‘हार्टलेस पिपल्स’! राजीव कपूर यांच्या निधनानंतर कपूर फॅमिलीचे सेलिब्रेशन

सोशल मिडियावर या पार्टीवरुन करिना, रणबीर बरेच ट्रोल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे ९ फेब्रुवारी २०२१ निधन झाले. परंतु निधनाच्या घटनेला सहा दिवसही नीट उलटले नसताना कपूर फॅमिलीकडून बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि राजीव कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांच्या बर्थ डे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या बर्थ डे पार्टीचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

या पार्टीत करिना कपूर, सैफ अली खानसह तैमुर नजर आला.

- Advertisement -

या फोटोवर सध्या नेटकऱ्यांकडून अतिशय वाईट पद्धतीने टीका होत आहे. अनेकांनी या फोटोंना पाहून ‘हार्टलेस पिपल्स’ अशी कमेंट केली आहे. १५ फेब्रुवारी म्हणजे आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि करिना-करिश्माचे वडील रणधीर कपूर यांचा ७४ वा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त चेंबुर येथीस कपूर फॅमिलीच्या घरात खास डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कपूर फॅमिलीतील ज्येष्ठ सदस्य असलेले राजीव कपूर यांच्या निधनाला सहा दिवस उलटत नाही तोपर्यंत कपूर कुटुंबियांकडून बर्थ डे पार्टीचे सेलिब्रेशन होत असल्याचे पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

रणबीर कपूरसह त्याची गर्लफ्रेंड आलिया भटही कॅमेरात कैद झाली आहे.

- Advertisement -

या पार्टीमध्ये रणबीर कपूर, त्याची गर्लफ्रेंड आलिया, करिना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, संजय कपूर, आदर जैन, तारा सुतारिया, बबीता कपूर, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर अशी संपूर्ण कपूर फॅमिली एकत्र जमली होती. या पार्टीचे फोटो सध्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम सर्वत्र व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनवरून नेटकऱ्यांनी करिना कपूर आणि रणबीर कपूरला लक्ष केले आहे. काकाच्या निधनाच्या दुख:ला एक आठवडा उलटला नसताही तुम्ही कसे पार्टी करु शकता ? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तर अनेकांनी राजीव कपूर यांच्या निधनानंतरच्या या पार्टीवर प्रतिक्रिया देत बॉलिवूडमध्ये कोणाजवळही भाव भावना उरल्या हेच यातून दिसतेयं असे म्हंटले आहे. १३ फेब्रुवारीला राजीव कपूर यांच्या निधनाचा चौथा वा दिवस पार पडला. यावेळी कपूर कुटुंबासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर होते. 9 फेब्रुवारीला अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. ते 58 वर्षांचे होते. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांचे राजीव सर्वात धाकटे बंधू होते.


हेही वाचा- बॉलिवूड अभिनेता सचिन जोशी ईडीच्या ताब्यात

 

- Advertisement -