घरताज्या घडामोडी'गिरा हुआ इंसान' म्हणणाऱ्या सुनील पालला मनोज वाजपेयीचं सडेतोड उत्तर

‘गिरा हुआ इंसान’ म्हणणाऱ्या सुनील पालला मनोज वाजपेयीचं सडेतोड उत्तर

Subscribe

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन सुनील पालने अभिनेता मनोज वाजपेयीबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होत. मनोज वाजपेयीला ‘गिरा हुआ इंसान’ असं म्हटलं होत. एवढंच नाहीतर मनोज वाजपेयीची अलीकडे प्रदर्शित झालेली वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन २’ची तुलना पोर्नसोबत केली होती. आता सुनील पालच्या या वक्तव्यावर मनोज वाजपेयीने सडेतोड उत्तर दिले आहे. दरम्यान सुनील पालने हे वक्तव्य राज कुंद्राच्या पॉर्न फिल्मप्रकरणावर बोलताना केले होते. सुनील पाल म्हणाला होता की, ‘आता इंडस्ट्रीमध्ये फक्त हेच राहिले आहे. एक मोठा अभिनेता असून मनोज वाजपेयीपण अशाप्रकारे शो करत आहे, ज्यामध्ये अश्लील दाखवले जात आहे.’

सुनील पालने केलेल्या या वक्तव्यावर मनोज वाजपेयीने इन-डायरेक्ट उत्तर दिले आहे. हिंदुस्तान टाईम्ससोबत बातचित करताना मनोज वाजपेयी म्हणाला की, ‘लोकांकडे काम नाही आहे, हे मी समजू शकतो. मी स्वतः या परिस्थितीतून आलो आहे, परंतु या परिस्थितीत आल्यानंतर लोकांनी मेडीटेशन केले पाहिजे.’

- Advertisement -

राज कुंद्रा प्रकरणाबाबत माध्यमांसोबत बोलताना सुनील पाल म्हणाला होता की, ‘जे झाले, ते होणारच होते. राज कुंद्राला अटक होणे गरजेचे होते. मी असं यामुळे म्हणतोय की, कारण मोठी लोकं याचा फायदा उचलत आहेत. डिजिटल प्लेप्टफॉर्मवर कोणत्याही प्रकारे सेंसराशिप लावली नाही आहे. यावर सगळ्या प्रकारचे शो होत आहेत, ज्यामध्ये सर्व काही दाखवले जात आहे. वाईट भाषेचा वापर केला जात आहे. अभिनेता किती मोठा असो मनोज वाजपेयीसारखा खालच्या पातळीचे आणि बदमाश माणूस मी पाहिला नाही.’


हेही वाचा – Jiah Khan death case: ८ वर्षांपासून प्रलंबित जिया खानच्या प्रकरणाची सुनावणी CBI कोर्टात


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -