घरताज्या घडामोडीNilu Phule : हिंदी बायोपिकमधून उलघडणार अभिनेते निळू फुले यांचे आयुष्य

Nilu Phule : हिंदी बायोपिकमधून उलघडणार अभिनेते निळू फुले यांचे आयुष्य

Subscribe

निळू फुले यांची हिंदीसिनेसृष्टीत बायोपिर येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून, या नववर्षांतच या बायोपिकच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. या बायोपिकची घोषणा करण्यात आली असून, निळू फुले यांची मुलगी गार्गीकडून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राईट्स घेण्यात आले आहेत.

मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच दिग्दज व्यक्तिमत्त्व असणाऱ्यांचे बायोपिक बनत असतात. मात्र आतापर्यंत तुम्ही अनेक क्रिडाक्षेत्रातील आणि स्वातंत्र्यसैनिकांवर बायोपिक आल्याचे पाहिले असाल. दरम्यान, या नववर्षात अनेक बायोपिक आले असून, त्यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ‘बाई वाड्यावर या’…हा प्रसिद्ध डायलॉग कानावर पडताच ज्यांची आठवण येते,असे दिग्दज अभिनेते निळू फुले यांच्यावर आयुष्याचा उलघडा होणार आहे. निळू फुले यांची हिंदीसिनेसृष्टीत बायोपिक येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून, या नववर्षांतच या बायोपिकच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. या बायोपिकची घोषणा करण्यात आली असून, निळू फुले यांची मुलगी गार्गीकडून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राईट्स घेण्यात आले आहेत.  या चित्रपटात आता कोणत्या कलाकारांना कास्ट करणार याची माहिती गुलदस्त्यात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gargi Phule (@gargiphule)

- Advertisement -

 

निळू फुले हे चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार असून,त्यांनी 250 पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामगिरी बजावली आहे. चित्रपटामधून निळू फुले हे एक स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि एक अभिनेता म्हणून कसे घडले हे पाहायला मिळणार आहे. निळू फुले रुपेरी पडद्यावर खलनायकाच्या भुमिकेसाठी ओळखले जात असून, वास्तविक जीवनात त्यांनी समाजाच्या भल्याची अनेक कामे केली आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे २००७ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.

- Advertisement -

अन् निळू फुलेंची ‘ही’ चित्रपट गाजली…

मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. सलग ४० वर्ष निळू फुलेनी चित्रपटसृष्टीत काम केलं. १४० पेक्षा अधिक चित्रपट आणि १२ हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केलं. ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘थापाड्या’, ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘शापित’, ‘नरम गरम’, ‘जखमी शेर’ यासारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत. महाराष्ट्र सरकारने निळू फुले यांना ‘उत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार तीन वेळा दिला. तसेच संगीत नाटक अकादमी, अनंतराव भालेराव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.


हेही वाचा – Coronavirus : कोरोनावर मात केल्यानंतर नोरा फतेहीला ओळखणेही झाले कठीण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -