Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी खरंच नुसरत जहाँ आहे गर्भवती; बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा पहिला फोटो व्हायरल

खरंच नुसरत जहाँ आहे गर्भवती; बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा पहिला फोटो व्हायरल

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) गेल्या काही दिवसांपासून गर्भवती असल्याचा चर्चा सुरू आहेत. याबाबत तिने अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केली नाही आहे. पण आता नुसरत जहाँचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे नुसरत जहाँ गर्भवती असल्याची बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. तसेच या फोटोमुळे गर्भवती असल्याच्या चर्चांना देखील पूर्णविराम लागला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नुसरत जहाँ कुठेच दिसत नव्हती. फक्त तिची गर्भवती असल्याची चर्चा सुरू होती. पण आता गर्भवती असल्यामुळेच नुसरत कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करताना नुसरत जहाँचा फोटो खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये तिने सफेद गाउन घातला आहे. तसेच फोटोमध्ये दोन टॉलीवूडच्या अभिनेत्री श्राबंती आणि तनुश्री चक्रवर्ती नुसरतसोबत दिसत आहेत.

- Advertisement -

एका वृत्तानुसार नुसरतचा पती निखिल जैन म्हणाला की, ‘त्यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. गेल्या ६ महिन्यांपासून निखिल नुसरतसोबत राहत नाही आहे आणि अशात नुसरत गर्भवती आहे तर ते बाळ निखिलने आपले मानण्यास नकार दिला आहे.’ निखिल पुढे म्हणाला की, ‘बऱ्याच काळापासून नुसरत आणि त्याच्या संपर्क झाला नाही आहे.’ त्यामुळे पतीपासून वेगळे राहूनही नुसरत कशी गर्भवती झाली? याबाबत प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. अलीकडेच नुसरत निखिल जैनसोबतच्या रिलेशनशिपविषयी म्हणाली की, ‘परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. यासोबतच हा एक दोन वेगळ्या विभिन्न धर्मीय वायक्तींमधील विवाह असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे कायदेशीर रित्या हा विवाह वैध नाहीये. हे केवळ एक नाते किंवा लीव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे विभक्त होण्यासाठी कोणत्याही घटस्फोटाची गरजच नाही, असे स्पष्ट केले आहे.’

- Advertisement -

 

- Advertisement -