Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रभासच्या 'राधे श्याम'चा टिझर आउट, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

प्रभासच्या ‘राधे श्याम’चा टिझर आउट, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

प्रभासने त्याच्या चाहत्यांना केलेल्या प्रॉमिसनुसार व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्त्यावर चाहत्यांना दमदार सरप्राइज दिले आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता प्रभास सध्या चांगलाच चर्चेत आहे. कोरोनानंतर प्रभास त्याच्या आगामी सिनेमांच्या शुटींगला लागला आहे. प्रभास सध्या त्यांच्या वेगवेगळ्या नवीन सिनेमांचे धक्के त्याच्या चाहत्यांना देत आहे. प्रभासने ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. व्हॅलेंटाइनचा मुहूर्त पाहून प्रभासने त्याच्या नवीन सिनेमाची झलक त्याच्या चाहत्यांसाठी आणली आहे. सुपरस्टार प्रभासचा अपकमिंग सिनेमा म्हणजेच ‘राधे श्याम’. राधे श्यामचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. #ValentinesWithRS असे हॅशटॅग वापरुन सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमातून प्रभासचा एक दमदार लुक समोर येत आहे. टिझर सोबतच सिनेमाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. प्रभासने काही दिवसांपूर्वी सिनेमाचे पोस्टर शेअर करत प्रेक्षकांसाठी सरप्राईजची घोषणाही केली होती. प्रभासने त्याच्या चाहत्यांना केलेल्या प्रॉमिसनुसार व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्त्यावर चाहत्यांना दमदार सरप्राइज दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


प्रभास राधे श्याम हा सिनेमा येत्या ३० जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रिलिज झालेल्या टिझर मधून प्रभासचा हटके लुक समोर येत आहे. एका रोमँटिक लव्ह स्टोरीवर हा सिनेमा आधारित आहे. ‘तो रोमियो नाही जो ज्युलिएटसाठी जीव नाही देणार’, असे म्हणत प्रभासने सिनेमाचा टिझर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री पूजा हेगडे ही प्रभाससोबत मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास आणि पूजाची ही क्यूट जोडी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसत आहे.

- Advertisement -

राधेश्याम हा सिनेमा यूरोपच्या एका स्थापित महाकाव्य प्रेम कहानी असल्याचे मानले जाते. सिनेमात प्रभास आणि पूजा प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्याचबरोबर सिनेमात अभिनेता सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचे संपूर्ण शुटींग हैद्राबाद आणि यूरोपच्या काही प्रसिद्ध ठिकाणी करण्यात आले आहे. राधेश्याम हा सिनेमा प्रेक्षकांना हिंदी तसेच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही पाहता येणार आहे.


हेही वाचा – गश्मिर महाजनी आणि पूजा सावंत’ चे प्रायव्हेट चॅट लीक, करताहेत डेटींग

- Advertisement -