Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अफलातून आर. माधवन

अफलातून आर. माधवन

Subscribe

आर. माधवन हा एक अफलातून अभिनेता आहे. दूरदर्शनवर आणि अनेक टीव्ही मालिकांद्वारे काम करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्या नंतर त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, आता तर त्याचा प्रवास इतका उल्लेखनीय झालाय की, त्याच्यासह त्याचा मुलगा वेदांत याची देखील दखल सगळेजण घेताना दिसत आहेत.

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक निर्माता म्हणून तामिळ आणि हिंदी चित्रपट प्रसिद्ध आहे. मन भावना अभिनय, सह कलाकाराबरोबर उत्तम केमिस्ट्री हि माधवनची खासियत राहिली आहे. रहना है तेरे दिल में या चित्रपटापासून सुरुवात करून, माधवन याने तनु वेड्स मनू आणि रंग दे बसंती सारख्या चित्रपटांमध्ये अभिनायचे बारकावे जपत कायम उत्तम काम केलं.

- Advertisement -

रेहना है तेरे दिल में मधील दिया मिर्झा सोबतची मनमोहक केमिस्ट्री असो, तनु वेड्स मनू मधील कंगना राणौत सोबत केलेले काम असो किंवा अलई पयुथे मधील शालिनीसोबत शेअर केलेली आकर्षक उपस्थिती असो त्याची केमिस्ट्री नेहमीच लक्षवेधी ठरली आहे. ऑन-स्क्रीन हिरो म्हणून त्यांचा वारसा भारतीय चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग आहे.

हा अभिनेता लवकरच शशिकांतच्या आगामी क्रिकेट ड्रामा मध्ये दिसणार असून नयनतारा, सिद्धार्थ आणि मीरा जास्मिन यांच्यासोबत टेस्टमध्ये दिसणार आहे. हल्ली, खेळ विषयक चित्रपटांना चांगले दिवस आल्याचा फायदा, माधवन याला टेस्ट या चित्रपटाद्वारे मिळेल असे दिसते.


- Advertisement -

हेही वाचा- अंदाज बांधता येतो… तरी प्रेरणादायी

- Advertisment -