बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख इतर कलाकारांप्रमाणे सोशल मिडियावर बराच सक्रिय असतो. त्याच्या अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात. त्यामुळे रितेश अनेक आनंदाचे क्षण, मग ते पार्टीपासून ते कुटुंबियांमधील सोहळे चाहत्यांसाठी शेअर करत असतो. एवढेच नाही तर तो मित्रमंडळी आणि पत्नी जेनेलिया डिसूजासोबतचे व्हिडिओही शेअर करत असतो. नुकताच रितेशचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर गजब हिट होत आहे. रितेशने एका पांडाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हाउसफुल ३ सिनेमातील गाणं वाजत असून पांडा एक पायवर करत बसून डान्स करत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘आजा करें गोविन्दा का डांस, टांग उठा के’ हे गाणं वाजत आहे. रितेशने हा शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रितेशनं लिहिलं आहे की, ‘मास्क वापरायला विसरू नका, करोना अजून गेलेला नाही- बुलबुल पांडा’
View this post on Instagram
याआधीही रितेशने एक मित्रमैत्रिणींसोबतचा धमाल व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओलाही चाहत्यांनी लाईक्स, कमेंन्ट्सचा वर्षाव केला. या व्हिडिओमध्ये रितेश आपली पत्नी जेनेलिया आणि मित्रमैत्रिणींसोबत बॉलिवूडमधील सुपर ठरलेले ‘पैसा यह पैसा’ या गाण्यावर ताल धरला आहे. रितेश आपल्या धुंदीत स्विमिंग पुलच्या किनाऱ्यावर नाचत असतो यावेळी त्याची मैत्रिण नाचता नाचता स्विमिंगपूलमध्ये पडते. यावेळी त्याची मैत्रिण पडताना रितेशला घेऊनच पडले. एकंदर गमतीशीर, मज्जामस्तीवाला व्हिडिओ सोशल मिडियावर गाजत असून त्याला २ लाखावर व्ह्यूज आले आहेत. रितेश- जेनेलियाचा एकदम सिंपल लूक चाहत्यांच्या अधिक पसंतीस उतरत आहे. रितेशच्या वर्कफ्रंट सांगायचे झाल्यास, आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटातून तो अक्षय कुमार सोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
हेही वाचा- पहिल्या नवऱ्याला का सोडलं ? ट्रोलर्स च्या प्रश्नाला अभिज्ञाचं सणसणीत उत्तर