सलमानचा बॉडीगार्ड शेराचे वार्षिक उत्पन्न ऐकूण व्हाल हैराण

Bollywood actor Salman Khan Bodyguard Shera Annual Income Will Surprise You
सलमानचा बॉडीगार्ड शेराचे वार्षिक उत्पन्न ऐकूण व्हाल हैराण

बॉलिवूडच्या कलाकराच्या बॉडीगार्डची नेहमीच चर्चा सुरू असते. त्यापैकी एक म्हणजे सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा. याच्यापासून प्रेरित होऊन एक चित्रपट तयार झाला होता. माध्यमाच्या माहितीनुसार, ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट सलमान खानने शेराला समर्पित केला होता. या चित्रपटातील एका गाण्यात सलमान आणि शेर एकत्र दिसले होते. आज आपण याच शेराबद्दल जाणून घेणार आहोत.

एका शीख कुटुंबातील शेरा आहे. त्याचे खरे नाव गुरमीत सिंग जॉली असे आहे. शेराची सलमानसोबत ओळख कशी झाली होती? याची कहानी जबरदस्त आहे. माहितानुसार २०१५मध्ये एका पार्टीदरम्यान शेराची भेट सलमान खान आणि अरबाज खानसोबत झाली होती. यादरम्यान सलमान खान आपल्यासाठी एक बॉडीगार्ड शोधत होता. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी अरबाजने शेराला फोन केला आणि भेटण्यासाठी बोलावले. तेव्हापासून शेरा सलमानसोबत आहे.

१९८७मध्ये शेरा मिस्टर मुंबई ज्युनिअर आणि १९८८मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनिअरचा सेकंड रनरअप राहिला आहे. शेराला सलमानचा बॉडीगार्ड म्हणून वर्षाला २ कोटी रुपयांच्या जवळपास पगार आहे. शेराने सलमान खानच्या फूल टाईम बॉडीगार्ड बनण्यापूर्वी मायकल जॅक्सन, विल स्मिथ, जॅकी चेन आणि पेरिस हिल्टन सारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सची सिक्युरिटी सांभाळली आहे.


हेही वाचा – पोलंडच्या कॅरोलिना बीलॉवस्काने जिंकला Miss World 2021 चा किताब