घरताज्या घडामोडीभाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! यंदा 'हे' तीन मोठे चित्रपट रिलीज होणार

भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! यंदा ‘हे’ तीन मोठे चित्रपट रिलीज होणार

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आगामी चित्रपटासाठी खूप एक्साइटेड आहे. नुकतच त्याने आपल्या तीन चित्रपटांसंदर्भात मोठे विधान केले आहे. शिवाय त्याने आपल्या चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान म्हणाला की, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतो. ईश्वर तुम्हा सर्वांना आनंदी ठेवो, सर्वांचे भले करो आणि सर्वांना सुरक्षित ठेवो.’ सलमानने व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छासोबत आपल्या चाहत्यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. ते गिफ्ट म्हणजे यावर्षी चित्रपटगृहात सलमान खानचा एक नाही, दोन नाही तर तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

एका मुलाखती दरम्यान सलमान खान म्हणाला की, ‘यावर्षी माझे तीन चित्रपट ‘टायगर ३’, ‘किक २’ आणि ‘कभी ईद कभी दीवाली’ प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. यंदा सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये खूप कमी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कोरोनामुळे अनेक लोक चित्रपटगृहात जात नाही आहेत आणि काही लोक आपल्या आवडत्या स्टारचे चित्रपट पाहायला जात आहेत. सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये माझी चांगली पकड आहे आणि थिएटरच्या मालकांना मी ‘राधे’ प्रदर्शित करण्यासाठी विनंती केली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

सलमान पुढे म्हणाला की, ‘कोरोना अद्याप संपला नाही आहे. मी चित्रपटगृहाच्या मालकांना विनंती केली आहे की, स्क्रीनिंग दरम्यान सुरक्षात्मक पाऊल उचला. सर्व गोष्टींची काळजी घ्या. गेल्या २०२० वर्षाप्रमाणे २०२१ आणि येणारे पुढील वर्ष कधी तसे नसू देत, अशी माझ्या आशा आहे आणि मी प्रार्थना देखील करतो.’

- Advertisement -

हेही वाचा – Farmer Protest: रिहानाच्या ट्विटवर सलमान खानची ‘दबंग’ रिॲक्शन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -