घरताज्या घडामोडीShahrukh Khan जेव्हा दुःखी असतो, तेव्हा मन्नतच्या गच्चीवर जाऊन....

Shahrukh Khan जेव्हा दुःखी असतो, तेव्हा मन्नतच्या गच्चीवर जाऊन….

Subscribe

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या मुलगा आर्यन खान अटकेत असल्यापासून अवस्थ आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्यापासून आर्यनच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. याप्रकरणात अनेक मोठ-मोठे खुलासे होताना दिसत आहेत. पण यामुळे शाहरुख खान आणि गौरी खान खूप अवस्थ आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थररोड जेलमध्ये गेला होता. १५ मिनिटे शाहरुख आर्यनला भेटला. माहितीनुसार, यादरम्यान दोघं एकमेकांना पाहून खूप रडत होते. बऱ्याच दिवसांपूर्वी शाहरुखने एका चॅट शोमध्ये जेव्हा तो खूप अवस्थ किंवा दुःखी असतो तेव्हा तो काय करतो? हे सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख एका चॅट शोमध्ये म्हणाला होतो की, ‘मी तरुण असताना माझे आई-वडील मला सोडून गेले. परंतु दोघे वरती शिपायाप्रमाणे बसले आहेत आणि माझे संरक्षण करत आहेत. मला काहीच चिंता नसते. केव्हातरी दुःख होतो किंवा अवस्थ असतो तेव्हा मी माझ्या घरच्या गच्चीवर जातो. एक किंवा दोन चांदण्या निवडतो. त्या दोन चांदण्यामधील एक वडील आणि एक आई मानतो आणि त्यांच्याकडे प्रार्थना करतो की, तुम्ही सर्व काही ठीक करा. मग काही वेळात ती समस्या ठीक होते. माझा यावर विश्वास आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

- Advertisement -

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख शेवटचा चित्रपट ‘झिरो’ होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा होती. २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाहरुखचा हा चित्रपट इतर चित्रपटप्रमाणे ब्लॉकबस्टर ठरला नाही. या चित्रपटानंतर शाहरुखने बऱ्याच काळ ब्रेक घेतला. पण आता लवकरच शाहरुखचा ‘पठान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


हेही वाचा – Aryan Khan Bail Hearing: आर्यन खानला मिळणार का जामीन? आज जामीन अर्जावर हायकोर्टात होणार सुनावणी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -