Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona: सोनू सूदच्या मदतीचा ओघ सुरुच; आता इंजेक्शनची करतोय मदत

Corona: सोनू सूदच्या मदतीचा ओघ सुरुच; आता इंजेक्शनची करतोय मदत

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या लाटेमुळे देशातील परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. काही जण कोरोना लस किंवा रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन मिळण्यासाठी तासांतास रांगेत उभे राहत आहेत, तर काही जण ऑक्सिजनसाठी वणवण फिरताना दिसत आहे. त्यामुळे ही परिस्थितीपाहून सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोदू सूद. अजूनही सोनू सूदच्या मदतीचा ओघ सुरुच आहे. आता सोनू इंजेक्शनसाठी मदत करणार आहे.

सोशल मीडियावरून अनेक जण मदतीचा आवाज सोनू सूदला देत असतात. अशाच व्यक्तीने आपल्या काकासाठी सोनू सूदकडे मदत मागितली होती. सॅम नावाच्या या व्यक्तीने ट्वीट करून लिहिले होते की, ‘मला या औषधांची गरज आहे. माझे काका विशाखापट्टणमच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटमधील आयसीयूमध्ये आहेत.’ असे लिहित त्या युझरने औषधाच्या पावतीचा फोटो शेअर केला होता. या ट्वीटला सोनू सूदने तीन तासांत उत्तर देऊन तुम्हाला उद्या इंजेक्शन मिळतील असे सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान सोनू सूद आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक लॉकडाऊनमध्ये केलेल्या कामामुळे अधिक प्रसिद्ध झाला आहे. सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना घरी जाण्यासाठी मदत केली. त्यानंतर मागेल त्याला मदत असे घोषवाक्यच सोनूला लागू पडावे, एवढा मदतीचा सपाटा त्याने लावला आणि अजूनही तो करत आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सोनू सूद एका रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित झाला होता. त्यावेळी या शोमधील स्पर्धेक उदय सिंग यांनी सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत त्याच्या गावातील गोष्ट सांगितली. त्या गावातील अनेकांना पुरेसे अन्न देखील मिळत नसल्याचे सांगितले. यावेळी सोनूने या गावाला मोफत अन्न पुरवणार असल्याची घोषणा केली. हे मध्यप्रदेशमधील नीमच जिल्ह्यातील आहे.


हेही वाचा – Coronaviurs: कोरोनाच्या लढाईत अभिनेता झाला Ambulance ड्रायव्हर, करतोय लोकांचे अंत्यसंस्कार


- Advertisement -