सोनू सूदमुळे १२ वर्षानंतर तरुण राहिला स्वतःच्या पायावर उभा!

bollywood actor sonu sood
अभिनेता सोनू सूद

बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी देव झाला. अजूनही तो अनेकांना मदत करत आहे. आता सोनू सूदने एका तरुणाची आयुष्य बदलले आहे. १२ वर्षानंतर तरुण सोनू सूदमुळे स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. हा तरुण छत्तीसगढमधला असून त्याचे नाव अमन असे आहे.

गेल्या १२ वर्षांपासून पाठीच्या गंभीर आजारामुळे अमन अंथरुणावर होता. अमनचे वडील भाड्याच्या घरात राहतात आणि भाड्याने वाहन चालवतात. पैशांची कमरता आणि महागड्या उपचारामुळे आपल्या जवान मुलाला होणार त्रास पाहण्याशिवाय दोघांकडे काहीच पर्याय नव्हता. पण अंथरुणावर असलेल्या अमनने एक प्रयत्न केला, ज्यामुळे आता अमन लवकरच पायावर उभा राहणार आहे. सोनू सूद आणि डॉक्टर अश्वनी यांच्यामुळे अमनशी संबंधित स्वप्ने सर्व प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे अमनच्या आई-वडिलांनी सोनू सूद आणि डॉ. अश्वनीची स्तुती केली आहे.

अमनचे सर्व उपचार सोनू सूदच्या माध्यमातून कर्नाळाच्या विर्क रुग्णालयातील न्यूरो सर्जन डॉक्टर अश्वनी यांनी केले. अमन पाठीची शस्त्रक्रिया अनेक तास चालली होती. या शस्त्रक्रियेमुळे अमनला नवे आयुष्य मिळाले आहे. अमनला नवीन आयुष्य देणाऱ्या अश्वनीने आतापर्यंत सुमारे १ हजार डोके आणि पाठीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. अशा लोकांना मदत करण्याची संधी मिळते हे माझे भाग्य असल्याचे, सोनू सूद म्हणाला आहे.


हेही वाचा – दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा – सायरा बानो