कोरोना काळात मदत केल्यामुळे सोनूवर कोट्यावधीचं कर्ज

Actor Sonu Sood will represent India in the Special Olympics 2022
अभिनेता सोनू सूद करणार विशेष ऑलिम्पिक 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसच्या महामारीत लोकांसाठी ‘मसीहा’ बनून समोर आला. या संकट काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांना त्यांनी खूप मदत केली. अजूनही तो काही लोकांना मदत करत आहे. पण सोनू सूद इतकी मदत कशी करत आहे? हा प्रश्न लोकांच्या मनात सतत भेडसावत आहे. प्रवासी स्थलांतर मजूरांना घरी पाठवणे, त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे, लोकांच्या राहण्यासाठी घर बनवणे, लोकांचे उपचार करणे या सर्वांसाठी सोनू सूद आपल्या किंमती वस्तूंना गहाण ठेवल्याचे एका वृत्तानुसार समोर आले आहे.

सोनू सूदने गरजवंतांना मदत करण्यासाठी आपल्या ८ प्रॉपर्टी गहाण ठेवल्या आहेत. यामधून त्याने १० कोटींचे कर्ज घेऊन त्याने लोकांना मदतीचा हात पुढे केला. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, सोनूने आपली २ दुकाने आणि ६ फ्लॅट गहाण ठेवले आहेत. या प्रॉपर्टीची मालकी सोनू आणि त्याची पत्नी सोनालीकडे आहे. ही दोन्ही दुकाने ग्राऊंड फ्लोअरवर असून फ्लॅट्स शिव सागर कॉ-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. ही हाऊसिंग सोसायटी इस्कॉन मंदिरच्या जवळ एबी नायरवर आहे.

माहितीनुसार, सोनूने १० कोटी रुपये कर्जावर ५ लाख रुपये नोंदणी शुल्क भरला आहे. दरम्यान सोनू सूदकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. सोनू सूद ट्विटर सध्या जास्त सक्रिय असून गरजवंत लोकं त्यांच्या यामाध्यमातून संपर्क साधत आहेत. याशिवाय त्याने त्याचा हेल्पलाईन नंबर देखील जाहीर केला आहे.


हेही वाचा – सोनू सूदमुळे १२ वर्षानंतर तरुण राहिला स्वतःच्या पायावर उभा!