Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Father'sDay2021: सोनू सूदने मुलाला ३ कोटींची कार दिल्याची पसरली अफवा; सोनू म्हणाला....

Father’sDay2021: सोनू सूदने मुलाला ३ कोटींची कार दिल्याची पसरली अफवा; सोनू म्हणाला….

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात लोकांसाठी मसीहा झालेला अभिनेता सोनू सूद सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदबाबत अनेक बातम्या येत आहेत की, सोनू सूदने आपला मुलगा ईशानला ३ कोटींची मर्सिडीज गिफ्ट केली आहे. आता याबाबत सोनू सूदने मौन सोडले असून या बातम्याद्वारे अफवा पसरल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार, अलीकडेच सोनू सूदने दिलेल्या मुलाखतीदरम्यान याबाबत सांगितले. गाडी दिल्याचे वृत्त फेटाळून सोनू सूद म्हणाला की, या बातमीमध्ये काहीही सत्य नाही आहे. मी माझ्या मुलासाठी कोणतीही कार खरेदी केली नाही आहे. ती गाडी आमच्या घरी फक्त ट्रायलसाठी आली होती. आम्ही फक्त टेस्ट ड्रायव्हसाठी गेलो होते. आम्ही ती गाडी खरेदी केली नाही.

- Advertisement -

फादर्स डे निमित्ताने मुलाला गिफ्ट देण्याबाबत बोलताना सोनू सूद म्हणाला की, ‘यामध्ये फादर्स डेचा अँगल कसा आला. मी फादर्स डेला मुलाला कार गिफ्ट का करेल?. हा माझा दिवस आहे. फादर्स डेला सर्वात चांगले गिफ्ट माझी दोन मुलं मला देऊ शकतात, हा दिवस साजरा करण्यासाठी ते माझ्यासोबत आहे. मी त्यांच्यासाठी नेहमी आहे. ते आता खूप मोठे झाले आहेत. त्यांचे स्वतःचे आयुष्य आहे. एकत्र वेळ घालवणे ही एक लक्झरी आहे, जी मला वाटते की, मी ती मिळवली.’ सोनू सूदने मुलाला कार घेतल्याच्या बातम्यांवर ९० टक्के कमेंट्स सोनूच्या बाजूने होत्या.


हेही वाचा – Father’sDay2021:फादर्स डे ला नक्की पाहा’हे’पाच सिनेमा


- Advertisement -

 

- Advertisement -