Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video: सोनू सूदने टक्कल असलेल्या व्यक्तीची अशी केली हेअर स्टाईल

Video: सोनू सूदने टक्कल असलेल्या व्यक्तीची अशी केली हेअर स्टाईल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय दिसतोय. नुकताच सोनू सूदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनू एका टक्कल असलेल्या व्यक्तीची हेअर स्टाईल करताना दिसत आहे. त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, ‘हेअर स्टाईल करणं ही एक कला आहे. ते शिकणं आणि केसांना खूप चांगल्या प्रकारे सेट करण्यासाठी मी चांगला सराव केला आहे. आज मी सर्वात खास हेअर स्टाईलिंग करणार आहे.’ त्यानंतर सोनू हेअर स्टाईल करताना दिसत आहे. पाहा कशी केलीय सोनूने टक्कल असलेल्या व्यक्तीची हेअर स्टाईल…

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

सोनू सूदने २ तासांपूर्वी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ९ लाख ६२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओवर अभिनेत्री ईशा गुप्ता, फराह खान अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

दरम्यान सोनू सूद चाहते आणि प्रेक्षकांची मनोरंजन करण्याची संधी कधीच सोडत नाही. नेहमी सोनू मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. कोरोना महामारीत सोनूने निस्वार्थीपणे लोकांची ज्याप्रकारे मदत केली आहे, त्यामुळे त्याला लोकं देवासारखे मानत आहेत. कोणी त्याला देवाऱ्यात पूजताना दिसत होते, तर कोणी त्याला दूधाची अंघोळ घालताना दिसत होते.

- Advertisement -