घरताज्या घडामोडीबिहारमध्ये सोनू सूदचा पुतळा उभारण्याची तयार सुरू; हे समजताच तो म्हणाला...

बिहारमध्ये सोनू सूदचा पुतळा उभारण्याची तयार सुरू; हे समजताच तो म्हणाला…

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेक उपाययोजना करूनही देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी सरकार लॉकडाऊनचा कालावधी वाढवत आहे. ३१ मे पर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. लॉकडाऊनचा सर्वात जास्त परिणाम परप्रांतीय मजुरांवर झाला आहे. या मजुरांसाठी सरकार अनेक प्रयत्न करीत आहेत. तसेच या संकटात बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद देखील मोठी मदत करत आहे.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याकडे लोकं ट्विटरच्या माध्यमातून मदत मागत आहेत आणि तो त्याला प्रतिसाद देत आहे. आतापर्यंत सोनू सूदने हजारो प्रवासी मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. सोनू सूदच्या या कार्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान बिहारमध्ये त्याचा पुतळा तयार करणार असल्याचे समोर आलं आहे. पण सोनू सूदने या पुतळ्यावर खर्च करणारे पैसे गरीबांच्या मदतीसाठी वापरा, असं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. सोनू सूदने दिलेलं उत्तर अनेकांची मनं जिंकून घेणारं ठरलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन सोनू सूदने काही मजुरांसाठी काही गाड्यांची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे ही सुविधा सोनूने विनामुल्य उपलब्ध करून दिले आहे. ‘शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही’, असं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे. यापूर्वी त्याने आपले हॉटेल कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दिलं आहे. तसंच ५००० पीपीई किट्सची देखील त्याने मदत केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून सलमानने भाग्यश्रीसोबत किसिंग फोटोशूट करण्यास दिला नकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -