घरताज्या घडामोडीVideo: अवॉर्ड शोमध्ये सुशांतची उडवायचे खिल्ली, गायिकेनं शेअर केला व्हिडिओ

Video: अवॉर्ड शोमध्ये सुशांतची उडवायचे खिल्ली, गायिकेनं शेअर केला व्हिडिओ

Subscribe

सध्या सुशांतचा हा पुरस्कार सोहळ्यात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुशांत सिंह राजपूरच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दोन गट झाले आहेत. बॉलिवूडचे काही स्टार अभिनेत्याच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त करत असताना त्याने असे का केले? असा प्रश्न विचारत आहेत. तर असे काही स्टार्स आहेत जे बॉलिवूड इंडस्ट्रीत घराणेशाहीला विरोध दर्शवत आहेत आणि हेच सुशांतच्या आत्महत्येचे कारण असल्याचे सांगत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना रनौत देखील खूप चिडली. सुशांतची आत्महत्या नियोजित कट असल्याचे तिने म्हटले आहे. आता लोकगायिक मालिनी अवस्थी यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करून बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या नेपोटिज्मला विरोध केला आहे.

हा व्हिडिओ आयफा पुरस्कार सोहळ्या दरम्यानचा आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान आणि चॉकलेट बॉय शाहिद कपूर सुशांतला स्टेजवर बोलवून त्याची कशी खिल्ली उडवत आहे हे या व्हिडिओत पाहू शकता. या व्हिडिओत सुशांत दोन्ही स्टार्सचे सर्व काही ऐकून हसताना दिसत आहे. तसेच सर्व प्रेक्षक देखील हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी सध्या सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मालिनी अवस्थी यांनी हा व्हिडिओ ट्विटर शेअर करून लिहिले आहे की, ‘जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हापासून मी स्तब्ध झाले आहे! मनोरंजनच्या नावाखाली हा भयंकर प्रकार! अँकरिंगच्या नावाखाली मोठ्या कलाकारांच्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सुशांतसिंगला अपमानित करणे कसे योग्य आहे?’ मालिनी यांनी हा व्हिडिओ शाहरुख खान आणि शाहिद कपूरला टॅग केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अनिल कपूरची मुलगी नसतीस तर कामवाली झाली असतीस; नेटकऱ्यांनी सोनमला झापले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -