गेल्या वर्षी बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जगाचा निरोप घेतला. सुशांतचे अचानकपणे जाणे यावर त्याच्या चाहत्यांचा अजूनही विश्वास बसत नाही आहे. चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला विसरू शकत नाही आहेत. पण आता असे काही झाले आहे, ज्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अलीकडेच सुशांत सिंह राजूपतच्या फेसबुक पेजवरील त्याचा प्रोफाईल फोटो चेंज झाला आहे. यामुळे सुशांतचे चाहते भावूक झाले असून त्याला खूपच मिस करत आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या टीमने त्याचा फेसबुक प्रोफाईल बदलला आहे. जे पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. सुशांतचा प्रोफाईल पाहून चाहते भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘एका सेकंदासाठी मला असे वाटले, तू पुन्हा परतला आहेस.’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘जर तू जिवंत असतास आणि आपला डीपी स्वतः बदलला असतास.’ सुशांतचे चाहते सतत त्याच्या नव्या प्रोफाईलवर प्रतिक्रिया देत आहेत.
Posted by Sushant Singh Rajput on Tuesday, August 17, 2021
१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतच्या अकाली निधनानंतर त्याच्या टीमने सुशांतला समर्पित असलेल्या एका वेबसाईटबाबत घोषणा सोशल मीडियावर केली. १६ जून रोजी सुशांतच्या टीमने शेअर केले की, ‘तो दूर आहेस, परंतु तो अजूनही आमच्यासोबत जिवंत आहेस.’