घरताज्या घडामोडीसुशांतच्या आयुष्यात होती अजून एक तरुणी, ईडी चौकशीत खुलासा

सुशांतच्या आयुष्यात होती अजून एक तरुणी, ईडी चौकशीत खुलासा

Subscribe

सुशांत सिंह राजपूतची आणखी एका एक्स गर्लफ्रेंडबाबत ईडीच्या चौकशीत खुलासा झाला.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला उद्या दोन महिने पूर्ण होतील. पण अजूनही सुशांतने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. नुकतीच ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी केली. ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी उघडकीस आल्या. दरम्यान या ईडी चौकशीत आणखी एक बाब समोर आली आहे. माहितीनुसार, सुशांतच्या आयुष्यात अजून एक तरुणी होती. जी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. तो तिच्या फ्लॅटचे हप्ते देखील भरत होता. याबाबतचे वृत्त न्यूज नॅशनल टिव्हीने दिले आहे.

पण अद्याप सुशांतची ही एक्स गर्लफ्रेंज कोण आहे ते समोर आले नाही. ती राहत असलेला फ्लॅट सुशांतच्या नावावर आहे आणि ज्या बँक अकाऊंटमधून सुशांत त्या फ्लॅटचा हप्ता भरत होता त्या अकाऊंटमध्ये आता जवळपास ३५ लाख रुपये आहेत.

- Advertisement -

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले याप्रकरण पाटणा येथे एकमेव एफआयआर दाखल झाले आहे. बिहार सरकारच्या सूचनेनुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे.


हेही वाचा – सुशांतने केलं होतं हॉलिवूड पर्दापणाचं प्लॅनींग, डायरीची १५ पानं आली समोर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -