सुष्मिता सेनची लेक बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

Bollywood actor sushmita sen daughter renee sen ready to debut on Bollywood
सुष्मिता सेनची लेक बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती डिजिटल प्लेटफॉर्मच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. बॉलिवूड हंगाच्या वृत्तानुसार, रिनी ‘सुट्टीबाजी’ नावाच्या चित्रपटातून दिसणार आहे. हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट कोणत्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे आणि केव्हा होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे.

View this post on Instagram

Day 2 of #Suttabaazi

A post shared by kªƁǝǝƦ khuƦªƝª (@kabeerkhuranaofficial) on

सुष्मिता सेनची मुलगी रिनी, राहुल वोहरा, आणि कोमल छाबडियासोबत चित्रपटात दिसले. या चित्रपटात ती मुलीची भूमिका करणार आहे. तर राहुल आणि कोमल छाबडिया रिनीच्या आई-वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खुराना असून तो देखील या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या दुनियेत पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे रिनीचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रिनी शुटिंगमध्ये व्यग्र असल्याचे दिसून येत आहे.

View this post on Instagram

Together. Questioning the morality of cigarettes.

A post shared by kªƁǝǝƦ khuƦªƝª (@kabeerkhuranaofficial) on

 

सुष्मिताची मुलगी रिनी २१ वर्षांची आहे. रिनी सुष्मिता सेनची दत्तक घेतलेली मुलगी आहे. रिनी सुष्मिताची मोठी मुलगी असून त्यानंतर तिने अलीशाला दत्तक घेतले. सुष्मिताचे आपल्या दोन मुलींवर प्रचंड प्रेम आहे. दोघींसोबतचे फोटो नेहमी सुष्मिता इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. ज्यामध्ये ती मुलींसोबत मस्ती करताना दिसते.

View this post on Instagram

#Suttabaazi Day 1

A post shared by kªƁǝǝƦ khuƦªƝª (@kabeerkhuranaofficial) on

दरम्यान याच वर्षी सुष्मिता सेन हिने देखील डिजिटल प्लेटफॉर्मवर पदार्पण केले. तिची ‘आर्या’ ही वेबसिरीज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. सुष्मिताने खूप कालावधीनंतर अभिनयाच्या दुनियेत पुन्हा पाऊल ठेवले होती. सुष्मिताची ‘आर्या’ ही वेबसिरीज प्रेक्षकांनी खूप आवडली.