घरमनोरंजनदिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफच्या मनात भरली 'ही' अभिनेत्री? भावना केल्या व्यक्त

दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफच्या मनात भरली ‘ही’ अभिनेत्री? भावना केल्या व्यक्त

Subscribe

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून अभिनेता टायगर श्रॉफला ओळखले जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून टायगर श्रॉफ अभिनेत्री दिशा पटानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र आता त्यांच ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगत आहे. दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपनंतर टायगर त्याची सिंगल स्टेटस लाईफ जगतोय. अशात टायगरने आता नव्या जोडीदाराचा शोध सुरु केला आहे. दिशासोबतच्या ब्रेकअपनंतर टायगरच्या मनात एक दुसरी अभिनेत्री भरली आहे. त्यामुळे टायगरच्या नव्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून आहे.

टायगर आता आवडते ‘ही’ अभिनेत्री

- Advertisement -

टायगर श्रॉफ लवकरचं करण जोहरचा मसालेदार शो कॉफी विथ करणमध्ये दिसणार आहे. कॉफी विथ करण शोमध्ये टायगर श्रॉफ त्याच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे करताना दिसणार आहे. याच शोमध्ये टायगरने अखेर त्याचे रिलेशनशिप स्टेटस क्लिअर करणार आहे.

टायगरने शोमध्ये खुलासा केला की, तो सध्या सिंगल आहे. मात्र त्याला बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आवडते आणि त्याला तिच्याबद्दल आकर्षण वाटते. टायगर म्हणाला- मी सिंगल आहे. मात्र मला असे वाटते की, मी कोणालातरी शोधत आहे. टायगर इथेच थांबला नाही, तो पुढे म्हणतो की, मी नेहमीच श्रद्धा कपूरकडे आकर्षित होतो. मला वाटते की ती खूप सुंदर अद्भुत अशी आहे. तसेच टायगर श्रॉफने करण जोहरच्या शोमध्ये त्याचे आणि दिशा पटानीचे ब्रेकअप झाल्याचेही स्पष्ट केले आहे. यामुळे टायगर आता आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने इंडस्ट्रीमध्ये एक विशेष ठसा उमटवला आहे. टायगर श्रॉफने 2014 साली हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो लवकरच गणपत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही कॅमिओ करताना दिसणार आहेत. टायगरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचे किती प्रेम मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


कर्नाटकात अतिवृष्टी; पुरामुळे 27 जिल्हे आणि 187 गावे बाधित


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -