घरताज्या घडामोडीविक्की कौशल आणि कॅटरीना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा!

विक्की कौशल आणि कॅटरीना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा!

Subscribe

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक कपल म्हणजे विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ (vicky kaushal and katrina kaif). हे बॉलिवूडचे क्युट कपल नेहमी चर्चेत असते. बऱ्याच दिवसांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चा आहेत. पण याबाबत त्यांनी स्वतः कधीच कबुल केलं नाही. परंतु आता विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. विक्की आणि कॅटरीनाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे (vicky kaushal and katrina kaif engagement). याबाबतची माहिती फोटोग्राफर विरल भयानी याने आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

- Advertisement -

आज विक्की आणि कॅटरीनाचा साखरपुडा झाला आहे, असे म्हटले जात आहे. विरल भयानीने जरी याबाबत माहिती दिली असली तरी, त्याने ही पोस्ट सोशल मीडियावरून आता हटवली आहे. त्यामुळे विक्की आणि कॅटरीनाचा साखरपुडा झाला आहे की नाही, याबाबत अद्यापही कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. पाहायला गेले तर, दोघांचा घराच्या बाहेर कोणतीही सजावट देखील करण्यात आली नाही आहे. परंतु आता सगळीकडे विक्की आणि कॅटरीनाचा साखरपुडा झाल्याचा बातम्या वेगाने पसरत आहेत. तसेच त्या दोघांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

Bollywood actor Vicky Kaushal and Katrina Kaif secretly engaged
विक्की कौशल आणि कॅटरीना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा!

अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट ‘शेरशाह’ प्रदर्शित होण्यापूर्वी पार्टी झाली होती. यामध्ये विक्की आणि कॅटरीना एकत्र दिसले होते. या दोघांसोबत कॅटरीनाची बहीण इसाबेल कैफ देखील होती. परंतु या पार्टी दरम्यान दोघं एकत्र फोटो काढण्यासाठी टाळाटाळ करत होते.

- Advertisement -

हेही वाचा – Bigg Boss OTTमध्ये रेखाची एंट्री, शोमध्ये मोठी जबाबदारी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -