‘रंगीला’तील ‘तनहा’ गाण्यात उर्मिलाने परिधान केले ‘या’ अभिनेत्याचे बनियान

‘रंगीला’तील ‘तनहा’ गाण्यात उर्मिलाने परिधान केले ‘या’ अभिनेत्याचे बनियान

लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली. आज जरी उर्मिला मातोंडकर बॉलिवूड विश्वात नसून राजकारणात सक्रिय असली, तरी देखील उर्मिलाचे अनेक गाजलेले चित्रपट आणि गाणी चाहत्यांच्या मनात घर करून आहे. उर्मिलाच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक सुपरहीट चित्रपट रंगीला ठरला. या चित्रपटातील गाणी देखील चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. २६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘तनहा तनहा’ या गाण्याचा एक खास किस्सा उर्मिलाने नुकाताच शेअर केला आहे. (Urmila Matondkar Rangeela)

रंगीला या चित्रपटातील ‘तनहा तनहा’ गाण्यात उर्मिलाचा बोल्ड लूक पाहायला मिळला. या गाण्यात उर्मिला समुद्रावर डान्स करताना दिसतेय. या गाण्यात एके ठिकाणी तिने पांढऱ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातलेला दिसतो. मात्र प्रत्यक्षात हा ड्रेस नसून उर्मिलाने या गाण्यावेळी बनियन घातल्याचे समोर आले आहे. उर्मिलाने या गाण्याच्या शुटिंगच्या वेळी जॅकी श्रॉफचा पांढरा रंगाचा बनियान घातला होता. यासंदर्भातील खुलासा स्वत: उर्मिलाने केला आहे. नुकतीच उर्मिलाने ‘झी कॉमेडी शो’मध्ये हजेरी लावली होती.

यावेळी ती म्हणाली, “कोणाला माहित नाही मात्र रंगीला चित्रपटातील ‘तनहा तनहा’ गाण्यासाठी मी जॅकी श्रॉफचा बनियान घातला होता. यावेळी आम्हाला सांगितले गेले की, खरंखुरं वाटेल असा विचार करा, यावेळी आम्ही आमच्या कपड्यांबद्दल चर्चा करत होतो, तेव्हा जॅकी मला बोलला की, तू माझा बनियान घाल. पण तो कसा दिसेल याची मला अजिबात खात्री नव्हती. मात्र यासाठी माझं नंतर कौतुक झालं.”

एका मुलाखतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपल वर्मा यांनी देखील या ड्रेसचे श्रेय जॅकी श्रॉफला दिले होते. राम गोपाल वर्मा यांनी या गाण्यासाठी ठरवण्यात आलेल्या कपड्यांना नकार दिला होता. त्यांनी जॅकी श्रॉफच्या टीशर्टकडे बोट दाखवत उर्मिलासाठी असे काही तरी हवे असल्याची कल्पना मांडली होती. यावर जॅकीने त्याचे बनियान काढले आणि तो म्हणाला, “भिडू ये पहन लो”. त्यामुळे या ड्रेसचे श्रेय जॅकी श्रॉफला असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले होते.