बॉलिवूड कलाकारांकडून अर्जेंटिनावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

कतारमध्ये रंगलेल्या फिफा वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 चा अंतिम सामना 18 जानेवारी रोजी झाला. या स्पर्धेत ब्लॉकबस्टर चॅम्पियन फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रंगतदार मुकाबला झाला. या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला धूळ चारत फिफा चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. दरम्यान, आता बॉलिवूडमधील कलाकारांनी अर्जेंटिनाला शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्रिती झिंटा, प्रकाश राजव, कार्तिक आर्यन, शाहरुख खान यांसारख्या अनेकांच्या नावाचा समावेश आहे.

अर्जेंटिनावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेता शाहुरुख खानने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत लिहिलंय की, “आम्ही आत्तापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट फीफा वर्ल्ड कप फायनल काळामध्ये आहोत. मला माझ्या आईसोबत लहान टी.व्ही वरुन वर्ल्ड कप पाहिलेलं लक्षात आहे. धन्यवाद #Messi तुमच्याकडून आम्हाला मेहनत करण्याचे आणि स्वप्न पाहण्याचा प्रेरणा मिळते.”

 शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंह, कार्तिक आर्यन, प्रिती झिंटाने देखील दिल्या शुभेच्छा.

यांच्या व्यतिरिक्त आलिया भट्ट, वरुण धवन आणि अनन्या पांडेने देखील इंस्टाग्राम स्टोरी द्वारे शुभेच्छा दिल्या.

 


हेही वाचा  :

तुझ्या मुलीसोबत पठाण चित्रपट बघून दाखव; ‘या’ नेत्याचे शाहरुखला चॅलेंज