बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याची स्टार प्लसच्या ‘चिकू की मम्मी दूर की’ मालिकेत एंट्री

स्टार प्लसचा आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’ या मालिकेचा आकर्षित प्रोमो सोशल मीडियावर प्रर्दशित झाला आहे. यासोबतच आई मुलीच्या नात्याची सुंदर गोष्ट पाहायला मिळणार आहे. परिधि शर्मा (Paridhi Sharma)आणि वैष्णवी प्रजापति (vaishanvi prajapati) यांच्या या शोमध्ये आई मुलाची सुंदर गोष्ट दाखवण्यात आली आहे, जे एकमेकांनपासून वेगळे होतात आणि आपल्यामधल्या नृत्याच्या सामान धाग्याने जवळ येतात. जिथे चाहते आतुरतेने या शोची वाट पहात आहेत, स्टार प्लस आपल्या चाहतांसाठी एक मोठे सरप्राइज घेऊन सज्ज आहे.

आपल्या नवीन कल्पनांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये कोणतीच कसर न सोडण्याची दक्षता घेणारे, स्टार प्लस नेहमीच बॉलीवुडच्या दिग्गजांसोबत आपल्या यशस्वी संकल्पना राबवत असतात. यावेळी हे लोकप्रिय चॅनल आणखी एका दिग्गजासोबत जोडून घेण्यासाठी सज्ज झाले असून, यावेळी ते अधिक आकर्षक असणार आहे. मिळालेल्या नव्या माहितीनुसार, स्टार प्लस आपल्या आगामी ‘चीकू की मम्मी दूर की’ या शोच्या आगामी प्रोमोमध्ये प्रतिष्ठित डिस्को डांसर ‘मिथुन दा किंवा सुपरस्टार गोविंदा’ यांना सहभागी करण्याचा विचार करत आहे.

मिथुन दा आणि गोविंदा यांना बॉलीवुडचे डासिंग लेजेंड मानले जाते आणि या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे, यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी डासिंग सुपरस्टारपेक्षा वेगळा विचार नाही आहे. मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदा यांना पडद्यावर आपल्या अनोख्या प्रतिभेसाठी ओळखले जाते. आपल्या या दोघांपैकी एकाला ऑन-स्क्रीन पाहणे निश्चितपणे एक रोमांचक ट्रीट ठरेल.