घरमनोरंजनअक्षय कुमारसह 'या' बॉलिवूड अभिनेत्यांनी वाहिली विक्रम गोखले यांना श्रद्धांजली

अक्षय कुमारसह ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यांनी वाहिली विक्रम गोखले यांना श्रद्धांजली

Subscribe

मराठीसह हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (77) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. मात्र बुधवारपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि ते उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले. अखेर काल शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ होते. विक्रम गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, विक्रम गोखले यांच्या मृत्यूनंतर मनोरंजन सृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

अक्षय कुमार ने शेअर केलं ट्वीट

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करत अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विक्रम गोखले यांचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी एकूण खूप दुःख झाले. त्यांच्या सोबत भूलभुलैया, मिश मंगल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ओम शांती

रवि किशनने देखील केलं ट्वीट

- Advertisement -

भोजपूरी आणि बॉलिवूड अभिनेता रवि किशन यांनी देखील विक्रम गोखले यांचा फोटो शेअर करत एक ट्वीट केलंय त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, माझे आवडीचे कलाकार विक्रम गोखले आता नाहीत. महादेवांनी त्यांना आपल्या श्री चरणामध्ये स्थान द्यावे. ओम शांति शांति शांति.

 

 


हेही वाचा :

‘नटसम्राट’पासून ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत विक्रम गोखलेंचे मनोरंजन सृष्टीत मोठे योगदान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -