घरमनोरंजनबॉलिवूड कलाकारांनी चित्रपटाची माफक फी घ्यावी; भाजपा नेत्याचा सल्ला

बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटाची माफक फी घ्यावी; भाजपा नेत्याचा सल्ला

Subscribe

या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. दरम्यान, याचं संदर्भात आपलं मत व्यक्त करत भाजपाचे प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून बॉलिवूड चित्रपटांना सल्ला दिला आहे.

सध्या बॉलिवूडमधील प्रदर्शित होणारे चित्रपट बॉक्श ऑफिसवर भरघोस कमाई करण्यात असफल ठरत आहेत. एकानंतर एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत परंतु प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यास पसंती दर्शवत नाहीत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले मात्र, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. दरम्यान, याचं संदर्भात आपलं मत व्यक्त करत भाजपाचे प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून बॉलिवूड चित्रपटांना सल्ला दिला आहे.

भाजपा प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटला बॉलिवूड चित्रपटांसंबंधीत एक ट्वीट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “लक्षात ठेवा लोकांसाठी ओटीटी एक चांगला आणि स्वस्त पर्याय आहे. असं ट्वीट करत भाजपा नेते सय्यज जफर इस्लाम एकामागे एक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होऊनही बॉलिवूड कलाकार यामागचं खरं कारण समजू शकत नाहीत. जर कलाकार आपल्या कामाची माफक फी घ्यायला सुरुवात करतील. तेव्हाच चित्रपट निर्माते राष्ट्रीय हिताचे चित्रपट बनवण्यासाठी लक्ष केंद्रित करतील. यांनी अभिनेता शाहरूख खान, सलमान खान आणि अक्षय कुमारला टॅग देखील केलं आहे.”

- Advertisement -

दरम्यान, सध्या बॉलिवूड चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई पाहता येत नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आमीर खानच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाने आत्तापर्यंत केवळ 37 कोटींची कमाई केली आहे. मात्र या चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 200 कोटींचा खर्च करण्यात आला होता.


हेही वाचा :चित्रपटांवर होत असलेल्या बहिष्कारावर अर्जुन कपूरने व्यक्त केला संताप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -