Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कतरिनाची बहिण इसाबेल गिरवतेय हिंदीचे धडे

कतरिनाची बहिण इसाबेल गिरवतेय हिंदीचे धडे

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कॅफचे आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु तिच्या बॉलिवूड एंट्रीनंतरचे हिंदी बोलणे आणि अभिनय पाहता ती इंस्ट्रीमध्ये फार काळ टिकणार नाही असे अंदाज बांधले जात होते. मात्र तिने प्रत्येक सिनेमात आपली वेगळी छाप पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने हिंदी भाषेवर खूप काम केले. त्यामुळे आजपर्यंत कतरिनाचे अनेक सिनेमांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. यानंतर आता कतरिनाची लहान बहिण इसाबेल कैफ देखील तिच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

- Advertisement -

परंतु इसाबेलही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याआधी हिंदी भाषेचे धडे गिरवताना दिसत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी इसाबेल नेमकी कोणत्या गोष्टीवर मेहनत घेत आहे याबाबत बोलताना दिसली. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान इसाबेल म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून मी हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतेयं. हळूहळू मला ही भाषा जमू लागली आहे. परंतु कोणतीही भाषा शिकण्यासाठी वेळ लागतो त्याचप्रमाणे मलाही हिंदी भाषा शिकण्यासाठी वेळ लागतोय. हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतेय. आधीपेक्षा माझे हिंदी बोलण्यात सुधारणा झाली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, मी येत्या काही दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने हिंदी बोलू शकेन.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

- Advertisement -

इसाबेलने आपली बहिण कतरिनाबद्दलही आपल्या भावना या मुलाखतीत व्यक्त केल्या. इसाबेल म्हणाली, मी तिच्यापासूनच अभिनेत्री होण्याची प्रेरणा घेतली आहे. लहाणपणापासून मी एक डान्सर आहे. पण मी जेव्हा बहिण कतरिनाला अभिनय करताना पाहते तेव्हा माझ्या अभिनयात अधिक सुधारणा करण्याची गरज वाटते. तिला पाहूनच मी नाटक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. यादरम्यानच मला अभिनय क्षेत्र आवडू लागले. आता मी अभिनयाची आवड जपतेय. लहानपणापासून मला कला सादरीकरणाती आवड आहे. यात कतरिनाचे काम पाहून मला अधिक उत्साह मिळतो आणि तिच्यासाखरे चांगले काम करण्याची मला प्रेरणा मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)


 

- Advertisement -