Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रेग्नंसीच्या चर्चा होत असताना समोर आला ऐश्वर्याचा रायचा कातिलाना अंदाज

प्रेग्नंसीच्या चर्चा होत असताना समोर आला ऐश्वर्याचा रायचा कातिलाना अंदाज

विश्व सुंदरी ऐश्वर्या राय या फोटोत खुपच गॉर्जियस दिसत असून तिचा हा कातिलाना अंदाज सर्वांनाच तिच्या प्रेमात पडायला भाग पाडत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya rai bachchan)  तिच्या सौंदर्यामुळे फारच चर्चेत असते. तिच्या मनमोहक सौंदर्याचा अंदाज अनेक वेळा तिच्या सिनेमातून आणि आता सोशल मीडियाच्या माध्यामातून येत असतो. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचे सर्वांनी म्हटले होते. ऐश्वर्या फोटोमध्ये थोडी जाड झाल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे तिचे पोट देखील वाढल्याचे अनेक युझर्सनी सांगितले होते. त्यावरुन ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. ऐश्वर्या पुन्हा आई होणार या चर्चांना उधाण आलेले असतानाच ऐश्वर्याने सोशल मीडियावर तिचे नवे ग्लामरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून ऐश्वर्याच्या सौंदर्याचा पुन्हा एकदा प्रत्येय तिच्या चाहत्यांना आलेला आहे. (bollywood Actress Aishwarya rai bachchan share glamorous photos for dabboo ratnani calender photoshoot)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

- Advertisement -

ऐश्वर्याने मोनोक्रोम फोटो शूट केले आहे. विश्व सुंदरी ऐश्वर्या राय या फोटोत खुपच गॉर्जियस दिसत असून तिचा हा कातिलाना अंदाज सर्वांनाच तिच्या प्रेमात पडायला भाग पाडत आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या या नव्या फोटोशूटची जोरदार चर्चा रंगली आहे. ऐश्वर्याने टॉपसोबत जॅकेट घातले आहे. या फोटोमधील हाय वॉल्यूम वेवी हेअरस्टाइल ऐश्वर्याला फार सुंदर दिसत आहेत. ऐश्वर्याच्या या फोटोंवर नेटकरी प्रचंड फिदा झाल्याचे पहायला मिळत आहेत. तिच्या या फोटोंना लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. ऐश्वर्याच्या फोटोवर डब्बू रतनानी यांनी लिहिले आहे की, जेव्हा तुमच्या आत रोशनी असते तर ती तुमच्या चेहऱ्यावरही दिसते, असे म्हणत ऐश्वर्याच्या सौदर्याचे कौतुक केलेय.

ऐश्वर्या आगामी काळात मणिरत्नमच्या पोन्नियन सेलवन या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा एका तमिळ कथेवर आधारित आहे. हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असून ऐश्वर्या या सिनेमात नंदिनी ही भूमिका साकारताना दिसणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मैत्रीच्या सुंदर प्रवासावर आधारीत ‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisement -