Paris Fashion Week: ऐश्वर्या रायच्या मनमोहक वॉकने जिंकली करोडोंची मनं; बघा व्हिडिओ

Paris Fashion Week: ऐश्वर्या रायच्या मनमोहक वॉकने जिंकली करोडोंची मनं; बघा व्हिडिओ

बॉलिवूड विश्वात अनेक अभिनेत्रींपैकी ग्लॅमरस आणि लक्षवेधी अभिनेत्री म्हणून सर्वात प्रथन ऐश्वर्या रायचे नाव आवर्जून घेतले जाते. इतकेच नाही तर ती एक मॉडेल असून १९९४ मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’ चा किताब देखील पटकावला होता. तेव्हापासूनच तिच्या सौंदर्याने लोकांची मने जिंकली आणि तिच्या अभिनयाने लाखोंच्या मनावर भुरळ घातली. ऐश्वर्याने तिच्या करिअरची सुरुवात ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून केली होती. सध्या ऐश्वर्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. कारण चर्चा तिने केलेल्या नुकत्याच रॅम्प वॉकची. या वॉकचे कौतुक केवळ चाहत्यांनीच नाहीतर सेलेब्रिटींनेही जोरदार कौतुक केले.

या वॉकमध्ये ऐश्वर्या राय पांढऱ्याशुभ्र गाऊनमध्ये दिसतेय. या ग्लॅमरस लूकमध्ये ती पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे. मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये ऐश्वर्याचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्याच्या या अनोख्या अंदाजामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ‘देवदास’ची अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते. तिचे चाहते नेहमी तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ऐश्वर्या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

ऐश्वर्या रॉय या पॅरिस फॅशन वीकमध्ये लीला बेखति, हेलेन मिरेन यांच्यासोबत पोज देताना देखील पाहायला मिळाली. ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ऐश्वर्या तिच्या एका तमिळ चित्रपटासंदर्भाच चांगलीच लाईम लाईटमध्ये आहे. ती आता तिच्या आगामी ‘Ponniyin Selvan’ मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याशिवाय अनुराग कश्यपचा चित्रपट गुलाब जामुनमध्ये देखील दिसणार आहे.


‘तारक मेहता’ मालिकेतील ‘नट्टू काका’ यांचं कॅन्सरमुळे निधन