Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'कहो ना प्यार है' चित्रपटातील 'या' अभिनेत्रीने केली कोट्यावधींची फसवणूक!

‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने केली कोट्यावधींची फसवणूक!

Related Story

- Advertisement -

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी एक अभिनेत्री पुन्हा एकदा वादाचा भोवऱ्यात अडकली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अमीषा पटेल आहे. बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल पुन्हा एकदा कायद्याच्या कचाडीत अडकल्याचे समोर आले आहे. अमीषा पटेलला एका व्यापारीने अडीच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टात खेचले आहे. अजय कुमार सिंह नावाच्या एका व्यापाराने तिला कोर्टात खेचले आहे.

स्पॉटबॉय डॉट कॉमच्या वृत्तानुसार, अजय कुमार सिंह लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटचा मालक आहे. त्यांनी अमीषा पटेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमीषा पटेल हिने अडीच कोटी घेऊन फसवणूक केल्याचा आरोप अजय कुमार सिंह यांनी केला आहे. माहितीनुसार, २०१७ साली अमीषा पटेल अजय कुमार सिंह यांना एका कार्यक्रमात भेटली होती. त्याने तिने कंपनी देसी मॅजिकमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. जेव्हा अडीच कोटी रुपये चित्रपटासाठी ट्रांसफर केले. तेव्हा तिने या चित्रपटात काम करण्यात नकार दिला. तसेच जेव्हा हा चित्रपट कधी झाला नाही असे कळाले तेव्हा अमीषा पटेलकडून पैस परत मागण्यास सुरुवात केली. पण आतापर्यंत अमीषा पटेलने पैसे परत गेले नाही आहेत. त्यामुळे त्यांना कोर्टाच्या दारी जावे लागले. आता हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

- Advertisement -

झारखंड हायकोर्टाचे जज आनंद सेन यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून प्रकरणाबाबत ऐकले आणि अमीषा पटेलला २ आठवड्यात आपले उत्तर दाखल करण्यासाठी सांगितले आहे. जेव्हा अजय कुमार सिंह यांनी अमीषा पटेल हिच्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा तिने एक चेक दिला जो बाउंस झाला होता. आता याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे की, ‘अमीषा पटेलने अजय कुमार सिंह यासोबत फसवणूक केली आहे.’ कोर्टाने २ आठवड्याचा वेळ दोन्ही पक्षांना दिला आहे. आतापर्यंत यावर अमीषा पटेलची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे.


हेही वाचा – जान्हवीचा लाखमोलाचा ड्रेस


- Advertisement -

 

- Advertisement -