Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन किरण खेर कोरोना पाॅझिटीव्ह; मुंबईत रुग्णसंख्या वाढतेय?

किरण खेर कोरोना पाॅझिटीव्ह; मुंबईत रुग्णसंख्या वाढतेय?

Subscribe

बाॅलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार असलेल्या किरण खेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. किरण खेर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

बाॅलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार असलेल्या किरण खेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. किरण खेर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे. समाज माध्यमावर आपण कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याचे त्यांनी सांगितले आहे, सोबतच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही किरण खेर यांनी केले आहे.

किरण खेर यांचे ट्वीट

किरण खेर यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आपण कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे म्हटले आहे. तसेच, लोकांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहनही केले आहे. किरण खेर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिल्यानंतर, त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच, लवकर बरे व्हा, असेही ट्वीट करत म्हटले आहे.

- Advertisement -

किरण खेर यांना 2021 मध्ये मल्टीपल मायलोमा या ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांचे पती अनुपम खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर यांनी किरण खेर यांचा कॅन्सर बरा झाल्याचे सांगितले होते. कॅन्सरमधून ब-या झाल्यानंतर किरण खेर या इंडियाज गाॅट टॅलेंट या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

कॅन्सरमधून रिकव्हरी हा मोठा विजय

- Advertisement -

मागच्या वर्षी एका मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांनी किरण खेर यांनी जिंकलेल्या कॅन्सरच्या लढाईवर भाष्य केले. अनुपम खेर म्हणाले की, त्यांची रिकव्हरी हा सर्वात मोठा विजय आहे. मानवी आत्मा हा सगळ्यात मजबूत आहे. लेट गो करणे हा पर्याय नाही. कारण तुम्हाला माहिती आहे,यामुळे तुम्ही लोकांसाठी आदर्श बनता, असे अनुपम खेर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

( हेही वाचा: सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस अलर्ट; चाहत्यांनाही घराबाहेर थांबण्यास बंदी )

किरण खेर यांनी अनेक चित्रपटांमध्ये केलेय काम

किरण खेर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्या आईच्या भूमिकेत दिसून आल्या आहेत. देवदास, रंग दे बसंती, हम तुम, दोस्ताना, मै हॅू ना ही काही त्यांच्या चित्रपटांची नावे आहेत.

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असल्याचे दिसत आहे. 19 मार्चला 236 तर त्याआधी 13 मार्चपर्यंत 50 ते 100 रुग्ण आढळत होते. सध्या राज्यात कोविडचे 1309 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

- Advertisment -