सध्या सगळीकडे 2025 या नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी 2024 या वर्षातील काही खास आठवणी शेअर करत नववर्षाचं स्वागत करताना दिसत आहेत. मात्र एका बॉलीवूड अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
अभिनेत्री इलियाना डिक्रूझनेही चाहत्यांना 2024 या वर्षाची झलक दाखवली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये चाहत्यांना जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची झलक दाखवली आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिचा एक फोटो आहे, ज्यात तिच्या हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना वाटत आहे की, अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. इलियानाच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करून तिला शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
इलियाना डिक्रूझने मायकल डोलनशी लग्न केले आहे. या जोडप्याने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि त्याचे नाव कोआ ठेवले. यावर्षी, त्यांनी कोआचा पहिला वाढदिवस साजरा केला. इलियानाने इंस्टाग्रामवर हृदयस्पर्शी फोटो शेअर केले.
इलियानाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची ‘दो और दो प्यार’ या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी व सेंधिल राममूर्ती हे कलाकार होते.